Fact Check: PIN चोरी टाळण्यासाठी ATM मध्ये Transaction करण्यापूर्वी दोनदा 'Cancel' बटण दाबा? जाणून घ्या RBI च्या नावे व्हायरल होणाऱ्या पोस्टमागील सत्य
Viral post falsely attributed to RBI is fake. (Photo Credits: PIBFactCheck/Twitter)

रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (Reserve Bank of India) नावे सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यात पीन चोरी (PIN Theft) टाळण्यासाठी ट्रान्जॅक्शनपूर्वी 'Cancel' बटण दोनदा दाबा, असे म्हटले आहे. त्यामुळे पीन चोरीसाठी कोणी जर किपॅड सेटअप (Keypad Setup) केला असेल तर तो कॅन्सल होईल. सध्याच्या काळात फेक न्यूजचे (Fake News) पेव फुटले आहे. त्यात आता अजून एका व्हायरल पोस्टची भर पडली आहे.

पीआयबी फॅक्ट चेकने या व्हायरल मेसेजमागील तथ्य तपासले असून हा मेसेज फेक असल्याचे म्हटले आहे. तसंच आरबीआय हा मेसेज जारी केलेला नाही, हे ही स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर ट्रान्जॅक्शन सुरक्षित ठेवण्यासाठी पैसे ट्रान्सफर खाजगीमध्ये करा. पीन नंबर कार्डवर लिहू नका, अशा दोन सूचनाही पीआयबी कडून करण्यात आल्या आहेत. (CoWIN Hacked? 15 कोटी भारतीयांचा डेटा लीक झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; केंद्र सरकारने दिले 'हे' उत्तर)

Fact Check By PIB:

सरकार आणि सरकारच्या विविध विभागांकडून फेक न्यूजबद्दल नागरिकांना वारंवार सावध केले जाते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही मेसेजवर डोळे झाकून विश्वास ठेवणे त्रासदायक किंवा धोकादायक ठरु शकते. त्यामुळे योग्य माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.