Fact Check: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वांना अधिक फटका बसत आहे. अशातच तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला सुद्धा देशात सुरुवात झाली आहे. 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांना ही कोविडच्या लसीचे डोस दिले जात आहेत. अशातच सोशल मीडियात लसीकरण असो किंवा कोरोना व्हायरस संदर्भात विविध अफवा व्हायरल करण्यात येत आहेत. औषध ते विविध गोष्टींचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी वापर केला जात आहे. अशाच सोशल मीडियात सध्या एक मेसेज व्हायरल होत असून त्यात लस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासंबंधित सांगण्यात आले आहे. परंतु PIB फॅक्ट चेकच्या टीमने यामागील सत्य सांगितले आहे.
देशात आतापर्यंत 16.49 कोटी लसीचे डोस नागरिकांना दिले गेले आहेत. त्यामध्ये 3.28 कोटी जणांनी दोन्ही लसीचे डोस घेतले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, गुरुवारी देशात 23.70 लाख डोस दिले गेले.(Fact Check: पुढील 20 तास भारतासाठी कठीण असल्याची WHO कडून चेतावनी? जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य)
Tweet:
एक मैसेज में दावा किया जा रहा है कि 18 वर्ष से अधिक आयु के सभी लोग दिए गए लिंक के माध्यम से एक मोबाइल एप्लिकेशन को डाउनलोड कर #कोरोनावायरस के टीकाकरण के लिए पंजीकरण कर सकते हैं#PIBFactCheck: यह ऐप #फर्जी है। टीकाकरण के पंजीकरण के लिए https://t.co/61Oox5pH7x वेबसाइट विजिट करें। pic.twitter.com/O985FwPgXB
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 7, 2021
सोशल मीडियात व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये असे सांगण्यात आले आहे की, 18 वर्षावरील लोकांनी दिसत असलेल्या लिंकवर रजिस्ट्रेशन करावे. पीआयबी फॅक्ट चेक टीमकडून ते फेक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांनी ट्विट करत असे म्हटले की, एका मेसेजमध्ये दावा केला जातोय की 18 वर्षावरील नागरिकांनी लिंकच्या माध्यमातून एक मोबाईल अॅप डाऊनलोड करावे. त्यामधून तुम्ही लसीकरणाचे रजिस्ट्रेशन करु शकता.
परंतु ही माहिती खोटी असल्याचे पीआयबीने सांगितले आहे. त्यामुळे जर लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करायचे असल्यास तुम्ही http://cowin.gov.in येथे भेट देऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्ही आरोग्य सेतु किंवा उमंग अॅपचा सुद्धा रजिस्ट्रेशन करु शकता. रजिस्ट्रेशन वेळी तुम्हाला शासकीय आणि खासगी रुग्णालाचा ऑप्शन दाखवला जाईल. तेथे तुम्ही तुमच्या सोईनुसार लसीकरण केंद्राची निवड करु शकता.