Fake News | (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसचे संकट (Coronavirus Pandemic) सुरु झाल्यापासून त्यासंबंधित अनेक फेक न्यूज (Fake News) सोशल मीडिया माध्यमातून व्हायरल होऊ लागल्या. परंतु, काही फेक न्यूज पुन्हा पुन्हा व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर एक न्यूज व्हायरल होत आहे. त्यात कोरोना व्हायरस (Coronavirus) किंवा कोविड-19 (Covid19) व्हायरस (Virus) नसून बॅक्टेरीया (Bacteria) असल्याचे म्हटले आहे. तसंच Aspirin घेतल्याने हा रोग बरा होत असल्याचा दावाही या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) ने या व्हायरल मेसेज (Viral Message) मागील सत्याचा उलघडा केला आहे.

या व्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे की, "कोविड-19 रुग्णाच्या मृतदेहाची ऑटोप्सी करणारे सिंगापूर हा जगातील पहिला देश ठरला आहे. संशोधनानंतर कोविड-19 हा व्हायरस नसून बॅक्टेरिया असल्याचे समोर आले आहे. हा बॅक्टेरीया रेडिएशनची संपर्कात आल्यास मानवाच्या मृत्यूस कारणीभूत ठरतो."

हा मेसेज खोटा असल्याचे पीआयबी फॅक्ट चेकने म्हटले आहे. पीआयबीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "कोविड-19 हा व्हायरस आहे. बॅक्टेरीया नाही आणि Aspirin घेतल्याने तो बरा होत नाही." (Fact Check: कोविड-19 लस घेतल्यानंतर सेनेचे काही जवान बेशुद्ध पडल्याचा व्हिडिओ व्हायरल; PIB ने सांगितले सत्य)

Fact Check By PIB:

असा दावा करणारा मेसेज यापूर्वीही व्हायरल झाला होता. त्यावेळी देखील पीआयबीकडून सत्याचा खुलासा करण्यात आला होता. त्यामुळे अशा प्रकारच्या मेसेजवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यामागील सत्य जाणून घ्या अन्यथा दिशाभूल होण्याची दाट शक्यता आहे.