Eggs Growing on Plants in Pakistan (Photo Credits: Twitter)

अंडे (Egg) आधी की कोंबडी? हा प्रश्न अनंतकाळापासून विचारला जात आहे व त्याचे अजूनही ठोस उत्तर समोर आले नाही. आता अंडी झाडांवर उगवू शकतात का? असा प्रश्न विचारला तर कदाचित तुम्ही प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला वेडे ठरवाल. परंतु सोशल मिडियावर पाकिस्तानमधील (Pakistan) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात दावा केला जात आहे की, झाडांवर अंडी उगवता येतात. व्हिडिओमध्ये, प्रस्तुतकर्ता झाडांवर उगवलेली अंडी खरी आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. महत्वाचे म्हणजे या व्हिडिओमध्ये झाडांवर अंडी दिसतही आहेत.

प्रस्तुतकर्ता ही झाडांवरील अंडी तोडतो आणि त्यातून बाहेर पडणारा पदार्थ अगदी पारंपारिक अंड्यासारखाच असल्याचे दाखवतो. यामध्ये पुढे असाही दावा करण्यात आला आहे की, या अंड्यांना जास्त मागणी आहे तसेच या अंड्यांचे बुकिंग सहा ते 12 महिने आधी करावे लागते. पाकिस्तानमधील वनस्पतींवर वाढणाऱ्या अंड्यांचा व्हिडिओ युट्युब आणि ट्विटरसारख्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आला आहे. (हेही वाचा: पंतप्रधान रामबाण योजनाद्वारे उपचारासाठी मिळत आहेत 4000 रुपये? Fake Message व्हायरल, जाणून घ्या सत्य)

ही गोष्ट हास्यास्पद असली तरी, नेटिझन्सनी या बनावट व्हिडीओमागील सत्यता पडताळून पहिली. त्यामध्ये हा दावा खरा नसल्याचे समोर आले आहे. अजून एका व्हिडिओमध्ये, असे आढळून आले आहे की या बनावट व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेली अंड्याची रोपे ही 'पांढऱ्या वांग्याची' झाडे आहेत.

वनस्पतींच्या प्रजाती वेगवेगळे आकार आणि रंगांमध्ये फळे वाढवतात. तर हे वांग्याचे फळ अगदी अंड्यासारखे दिसते. काही किल्प्समध्ये आपल्याला ही वांगी दिसत आहेत, तर काही ठिकाणी लोकांनी पांढर्‍या वांग्याच्या झाडावर अंडी चिटकवली आहेत व नंतर ती फोडताना दिसत आहेत.