Durex Condom: मुंबईमधील खंडित झालेल्या वीजपुरवठ्याच्या आधारावर 'ड्युरेक्स कंडोम'ने प्रसिद्ध केली आपली हटके जाहिरात; 'Trust Us, It's a Sign' (See Photo)
Durex's new ad (Photo Credits: Durex Facebook Page)

आज मुंबई (Mumbai), नवी मुंबई (New Mumbai), ठाणे (Thane) व आसपासच्या इतर अनेक भागात वीज ग्रीड बिघाडामुळे मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा खंडित (Power Outage) झाला होता. अजूनही अनेक भागात वीज आली नाही व याबाबत दिवसभर अनेक युजर्सनी ट्विटरवर तक्रार केली. याचे प्रमाण इतके वाढले की, काही मिनिटातच मायक्रोब्लॉगिंग साइटवर #powercut ट्रेंड होऊ लागला. त्यानंतर कंडोम ब्रँड 'ड्युरेक्स'ने (Durex Condom) सोशल मीडियावरील या बझची दखल घेतली आणि त्यांनी एक हटके सोशल मीडिया क्रिएटिव्ह प्रसिद्ध केला. या जाहिरातीमध्ये म्हटले आहे- 'Trust us! It's a sign. #Mumbai #PowerCut, followed by a link to buy their products online'

ड्युरेक्सने प्रसिद्ध केलेल्या या क्रिएटिव्ह जाहिरातीमध्ये, व्हिडिओ कॉल, मेलबॉक्स, फोन, टीव्ही अशा गोष्टी बंद तर, फक्त ‘बेड’ असलेला इमोटिकॉन सुरु असल्याचे दाखविले आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने विजेवर चालणाऱ्या सर्व गोष्टी बंद होत्या मात्र अशावेळी तुम्ही बेडवर काही अॅक्शन करू शकता असे ड्युरेक्सला सांगायचे आहे. अनेकांनी या जाहिरातीखाली कमेंट करून या कंडोम ब्रँडच्या सर्जनशीलतेचे कौतुक केले आहे. (हेही वाचा: Durex Condom ने दिवाळीच्या निमित्तावर शेअर केलेली जाहिरात पाहून नेटकरी भडकले; ट्विटर वरून व्यक्त केला संताप)

पहा फोटो -

महापारेषणच्या कळवा-पडघा GIS केंद्रात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे, कल्याण, पालघर व नवी मुंबई मधील वीज खंडीत झाली. याच्या Cascading Effect मुळे मुंबई व मुंबई उपनगरातील वीज देखील खंडीत झाली. यामुळे कार्यालये तसेच लोकल रेल्वे गाड्यांची वाहतूक ठप्प झाली होती. सध्या बरेच लोक घरातून काम करत आहेत, त्यांच्या कामावरही यामुळे मोठा परिणाम झाला आहे.

दरम्यान, ड्युरेक्सने नेहमीच आपल्या हटके अंदाजात विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. याआधी वाहतूक नियम पाळत ‘Ride Safe'चा सल्ला त्यांनी दिला. होता.