Dog Viral Video: कुत्र्याचे पिल्लू आईच्या कुशीत, सोशल मीडियावर व्हिडिओ पाहून अनेकांना वाटले कौतुक
Dog | (Photo Credit - Twitter)

कुत्रा (Dog) हा प्राणीजगतातील मानवाच्या जवळचा सर्वाधिक प्राणी. जगभरामध्ये कुत्रा पाळणाऱ्यांचीच संख्या अधिक आढळते. अशा या कुत्र्याच्या अनेक करामती (Dog Viral Video) आपल्याला माहिती असतात. अनेकांना या कुत्र्याच्या करामतीही रंगवून सांगायला आवडते. सोशल मीडियावर असा व्हिडिओंची चलतीच असते. असाच एका कुत्र्याच्या पिलाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. खरोखरच मनावरचे ताण-तणाव कमी करण्यासाठी इंटरनेट हे अनेकदा महत्त्वाचा दुवा ठरते. इंटरनेटवर सोशल मीडियात व्हायरल झालेले व्हिडिओ अनेकदा या ताणावर उपायही ठरताना आढळतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जो एका कुत्र्याच्या पिल्लाचा (Puppy Viral Video) आहे.

गोल्डन रिट्रीव्हर चॅनल या ट्विटर अकाऊंटने 9 सेकंदाची व्हिडिओ क्लिप पोस्ट केली आहे. जी एक लाखाहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. या व्हिडिओत कुत्र्याचे एक पिल्लू त्याच्या झोपलेल्या आईला मिठी मारताना, तिच्या कुशीत शिरताना दिसत आहे. व्हिडिओ जसजसा पुढे जात आहे, ते दोघे शेवटपर्यंत एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत.हा इतका गोड क्षण आहे की, सोशल मीडियावर अनेकांनी त्याचे प्रेमळ शब्दात कौतुक केले आहे. (हेही वाचा, पुणे: शेजारणीच्या घरात कुत्रा भुंकल्याने महिलेला चपलेने बेदम मारहाण)

ट्विट

ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 120 हजारांहून अधिक व्ह्यूजसह व्हायरल झाला आहे. नेटिझन्स क्लिपमुळे आनंदित झाले आणि "मोहक" आणि "हृदयस्पर्शी" सारख्या शब्दांनी टिप्पणी करत आहे. एका ट्विटर युजरने म्हटले आहे की, “मला हसवल्याबद्दल धन्यवाद,” दुसर्या ट्विटर युजरने लिहिले. “हे खूप मोहक आहे.”