Dog Video | (Photo Credit - Twitter)

सोशल मीडिया (Social Media) अर्थातच इंटरनेटवर तुम्हाला कुत्र्याचे बरेच व्हिडिओ (Dog Video) आढळले असतील. कुत्राप्रेमी मंडळींना हे व्हिडिओ नेहमीच आवडत असतात. अनेकदा तर असे दिसते की, लोकांना त्यांच्या कुत्र्यांच्या गोंडस हालचाली आणि त्यांची मानवांप्रती असलेली निष्ठा आवडते. अनेक पाळीव कुत्र्यांना त्यांच्या मालकांकडून प्रशिक्षणासाठीही पाठवले जाते. असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल (Dog Viral Video) झाला आहे. ज्यामध्ये पाळीव कुत्र्यांचा एक गट त्यांच्या घराच्या कॉरिडॉरमध्ये त्यांच्या स्कूल बसची वाट पाहत आहे.

बुइटेन्जेबिडेन (Buitengebieden ) नावाच्या एका युजर्सने ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, कुत्रे स्कूल बसची वाट पाहत आहे. व्हिडिओ victoriadw619 नावाच्या वापरकर्त्याला श्रेय देण्यात आला आहे. या व्हिडिओचे श्रेय त्यांनी Victoriadw619 नावाच्या वापकर्त्याला दिले आहे.

व्हिडीओची सुरुवात घराच्या कॉरिडॉरमध्ये कार्पेटवर बसलेल्या वेगवेगळ्या जातीच्या कुत्र्यांच्या झुंडीने होते. खांद्यावर बॅग आणि आवश्यक कपडे घेऊन ते सर्व तयार दिसत आहेत. सर्व कुत्र्यांच्या गळ्यात पिवळा पट्टा बांधला आहे. हे कुत्रे स्कूल बसची वाट पाहत असताना ते वेगवेगळ्या डिझाइनच्या पिशव्या घेऊन जाताना दिसतात. (हेही वाचा, Dog Viral Video: कुत्र्याचे पिल्लू आईच्या कुशीत, सोशल मीडियावर व्हिडिओ पाहून अनेकांना वाटले कौतुक)

व्हिडिओला फक्त एका दिवसात 2.2 दशलक्षाहून अधिक Views आणि 71,000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. लोक अजूनही व्हिडिओ पाहात आहेत. 6,500 हून अधिक वापरकर्त्यांनी पोस्ट रीट्विट केली आहे आणि अनेकांनी त्यांच्या हृदयस्पर्शी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ट्विट

एका युजर्सने म्हटले आहे की, कमाल आहे, हे सगळे पिवळे पट्टे कसे घालतात? तुम्ही फोटो जरी पोस्ट केला नसता तरीही आम्हाला कळले असते आपण आपल्या लाडक्या कुत्र्यांबाबत बोलत आहात. आणखी एका युजर्सने म्हटले आहे की, खूपच गोड, कित्ती मज्जा, फार आवडला हा व्हिडिओ. आणखी एक युजर्स म्हणतो अरेच्छा.. आम्हीही इतक्या उत्सुकतेने कधी शाळेत नव्हतो गेलो.