प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

पुणे (Pune) येथे शेजारणीच्या घरात कुत्रा भुंकल्याने महिलेला एका व्यक्तीने चपलेने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिने व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र त्याला नंतर जामीनावर सोडून देण्यात आले.

पीडित महिलेकडे 4 कुत्रे आहेत. मात्र तिच्या जवळील कुत्रे सोसायटीमधील कोणत्याच व्यक्तीला त्रास देत नाही. परंतु सोसायटीमधील घराच्या बाजूला राहणाऱ्या व्यक्तीला कुत्रे आवडत नव्हते. मात्र कुत्रा भुंकत असल्याचा राग आल्याने त्याने महिलेला सोसाटीच्या आवारात अडवत त्याच्या पायामधील चप्पल काढून मारहाण करण्यास सुरुवात केली.(पुणे: डांगे चौक परिसरात तरूणीवर भरदिवसा हल्ला; 21 वर्षीय आरोपी अटकेत)

या प्रकरणी महिलेची आईसुद्धा भांडण सोडवण्यासाठी गेली असता व्यक्तीने तिलासुद्धा शिवीगाळ केली. त्यानंतर महिलेने पोलिसात धाव घेतली. तसेच व्यक्तीच्या या वागणुकीवर महिलेने संताप व्यक्त केला आहे.