कोरोना विषाणूने (Coronavirus) आपले रंग-रूप दाखवायला सुरुवात केल्यावर, हळू हळू रोजच्या जीवनातील अनेक गोष्टी बदलल्या. वरचेवर हात स्वच्छ करणे, मास्क (Mask) वापरणे या सध्या अतिशय महत्वाच्या गोष्टी बनल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सध्या मास्कचे वेगवेगळे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. या दरम्यान, चक्क सोने (Gold Mask) आणि चांदीचे मास्कही (Silver Mask) पाहायला मिळाले आहेत. मात्र आता तर कहरच झाला आहे. सुरत येथील एका सराफाने चक्क हिऱ्याने मढवलेलेले मास्क (Diamond-Studded Face Masks) विक्रीसाठी ठेवले आहेत. सध्या या मास्कचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
या मास्कवर खास हिरे लावले असून, याची किंमत एक लाखांपासून ते 4 लाखांपर्यंत आहे. खास लग्न समारंभात घालण्यासाठी या मास्कना डिझाईन केले आहे. डी. खुशालभाई ज्वेलर्स (D. Khushalbhai Jewellers) नावाच्या सूरतमधील दागिन्यांच्या दुकानात नवीन जोडप्यांची ही खास ऑफर आहे. या दुकानात डायमंड-स्टडेड अनेक प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. पत्रकार जनक दवे यांनी ट्विटरवर या दुकानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'सूरत मधील हिरे व्यापारांनी डायमंडनी मढलेले मास्क तयार केले आहेत. हे मास्क खासकरुन लग्नात उठून दिसण्यासाठी खूप उपयुक्त ठरतील. लग्नात जोडप्यांसाठीही खास मास्क आहेत. या मास्कची किंमत 1 लाख ते 4 लाख रुपये आहे.’ (हेही वाचा: Silver Mask: सोन्याच्या पाठोपाठ आता चांदीचा मास्क सुद्धा चर्चेत; रत्नागिरी मधील शेखर सुर्वे यांचा 'हा' फोटो होतोय व्हायरल (See Photo))
पहा व्हिडिओ-
सूरत :
हीरा कारोबारियों ने हीरे के मास्क बनाये है।खासकर शादी में कुछ अलग दिखने के लिए यह मास्क काफी मददगार साबित होंगे।
शादी में जोड़े के लिए भी डायमंड से बने मास्क उपलब्ध है।
मास्क की कीमत 1 लाख से 4 लाख रुपये है।@Smita_Sharma @maryashakil @nistula @raydeep pic.twitter.com/LlleiFeIzC
— Janak Dave (@dave_janak) July 9, 2020
अनेकांना मोठे, ग्रॅन्ड लग्न हवे असते. मात्र सध्या लॉक डाऊन आणि नियम यामुळे हे शक्य नाही. असे लोक कदाचित या प्रकारच्या मास्कचा वापर करून शो-ऑफ करू शकतात, तुम्हाला काय वाटते? हौसेला मोल नाही असे म्हणतात, म्हणूनच पिंपरी चिंचवड येथील शंकर कुऱ्हाडे (Shankar Kurhade) या इसमाने चक्क सोन्याचा मास्क बनवला आहे. साडे पाच तोळ्याचा हा मास्क बनवण्यासाठी शंकरने 2 लाख 90 हजार रुपये खर्च केले आहेत.