Silver Mask: सोन्याच्या पाठोपाठ आता चांदीचा मास्क सुद्धा चर्चेत; रत्नागिरी मधील शेखर सुर्वे यांचा 'हा' फोटो होतोय व्हायरल (See Photo)
Silver Mask Viral Photo (Photo Credits: Instagram)

रत्नागिरी (Ratnagiri)  मधील मांडवी (Mandavi) येथे राहणारे शेखर यशवंत सुर्वे (Shekhar Surve) यांनी खास कोल्हापूर (Kolhapur)  येथून एक चांदीचा मास्क (Silver Mask) तयार करून घेतला आहे. सुर्वे यांचा हा मास्क घातलेला फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  या बाबत माहिती देताना शेखर सुर्वे यांनी सांगितले की,"एक आवड म्हणून हा मास्क घेतला आहे, मास्क 60 ग्राम चा असून त्याची किंमत 3900 रुपये आहे. मी एक फोटो मोबाईल वर बघितला होता तसा मास्क मला हवा होता म्हणून माझ्या सोनाराने असा खास डिझाईनचा मास्क बनवला. 15 दिवसांंपूर्वी कोल्हापूर वरून एक व्यक्ती हा मास्क घेऊन आला.केवळ हौस म्हणुन हा मास्क बनवला आहे,सुरक्षेसाठी मात्र आम्ही सुद्धा नियमित मास्क वापरतो असे सुद्धा सुर्वे यांंनी सांगितले आहे.

आपण काही दिवसांपूर्वी सोन्याच्या मास्क बद्दल सुद्धा ऐकले होते, पिंपरी चिंचवडचे (Pimpri Chinchwad) शंकर कुऱ्हाडे (Shankar Kurhade) यांनी चक्क सोन्याचा मास्क (Gold Mask) बनवला आहे. हा मास्क साडे पाच तोळ्याचा असून यासाठी तब्बल 2 लाख 90 हजार रुपये खर्च करण्यात आले होते. त्या तुलनेत सुर्वे यांचा मास्क हा स्वस्तात मस्त पर्याय म्हणता येईल.

चांदीचा मास्क घालुन शेखर सुर्वे यांचा फोटो

 

View this post on Instagram

 

A post shared by ek kokanvasi™ (@ek_kokanvasi) on

दरम्यान हे सोन्या-चांदीचे मास्क सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधुन घेत आहेत. या मास्कचा कोरोना पासुन वाचण्यासाठी काही विशेष उपयोग नाही पण हौसेला मोल नाही म्हणतात ना त्या वाक्याची या उदाहरणातुन पुरेपुर सार्थ पटते.