Delhi Vada Pav Girl (PC - Instagram)

Delhi Vada Pav Girl: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी ढसाढसा रडताना दिसत आहे. खरं तर ही मुलगी 'वडा पाव गर्ल' (Vada Pav Girl) या नावाने प्रसिद्ध आहे. चंद्रिका गेरा दीक्षित असे तिचे नाव असून ती फूटपाथवर स्टॉल लावून मुंबईतील प्रसिद्ध खाद्यपदार्थ वडा पाव (Vada Pav) विकते. ते खाण्यासाठी लोकांची लांबच लांब रांग लागते. पण सध्या चंद्रिका एका खास कारणामुळे चर्चेत आहे. फूडवॉल्स नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ती रडताना आणि वडा पाव विकताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये वडा पाव गर्लने आपली तक्रार सांगितली आहे. यात चंद्रिका सांगत आहे की, एमसीडीचे लोक तिचा स्टॉल बंद करण्यास सांगत आहेत. मी त्यांना वेळेवर पैसे देत आहे पण तरीही त्यांना माझा स्टॉल बंद करायचा आहे. व्हिडिओमध्ये चंद्रिका फोनवर मदतीची याचना करताना दिसत आहे. (हेही वाचा -Loose Maggi Viral Video: पिशवीभर घ्या.. काय काय आलंय बघा! रस्त्यावर किलोवर मॅगी; बरी की वाईट? पाहा व्हिडिओ)

चंद्रिकाने पुढे बोलताना सांगितलं आहे की, एमसीडीचे लोक त्याला त्रास देत आहेत. मी काय चूक केली आहे की ते मला स्टॉल लावण्यापासून रोखत आहेत. ती स्टॉलवर उभ्या असलेल्या ग्राहकांना विचारते की तिची चूक आहे का? यावर अनेक ग्राहक तिला सांगतात की, उदरनिर्वाह करण्यात काहीच गैर नाही. चंद्रिका पुढे सांगते, नुकतेच मी 30 हजार ते 35 हजार रुपये दिले, मात्र तरीही ते त्रास देत आहेत. हा सगळा पैशाचा खेळ आहे.

पहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajat Upadhyay (@foodbowlss)

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, वापरकर्ते देखील जोरदार कमेंट करत आहेत. अनेक वापरकर्त्यांनी एमसीडीकडून स्टॉलसाठी परवानगी घेण्याचा सल्ला दिला. एका युजरने म्हटले आहे की, हा कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाचा प्रश्न नाही. हे फक्त MCD नियमांबाबत आहे. हे फूड स्टॉल म्हणजे एकप्रकारे सरकारी जमिनीवर अतिक्रमणच आहे. आणखी एका युजरने सांगितले की, येथे फूड कोर्ट सुरू करण्यासाठी अनेक परवाने आवश्यक आहेत आणि हे परवाने मिळविण्याची किंमत खूपच महाग आहे.