अजगर आणि मगरी मध्ये जुंपलेल्या लढतीत अजगराने केली मगरीवर मात, क्षणार्धात गिळले मगरीला, पाहा व्हायरल फोटोज
Crocodile and Python Fight (Photo Credits: Facebook)

अजगर आणि मगर हे दोन्ही सरपटणारे खूपच भयंकर प्राणी आहेत. या दोघांच्या तावडीत जर कोणी सापडले तर त्याचा मृत्यू अटळच आहे असं समजावं. मात्र जेव्हा या मगर आणि अजगरामध्ये लढाई होते तेव्हा कोण जिंकेल असा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर तुमचे उत्तर मगर असेच असेल. कारण अजगराच्या तुलनेत मगर खूपच बलवान आहे आणि तिच्या तोंडाचा आकार खूपच मोठा असून तिचे दातही तितकेच तीक्ष्ण आहेत. त्यामुळे मगर अजगराला अगदी सहजपणे गिळंकृत करु शकते. मात्र तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की एका अजगराने चक्क एका मगरीला गिळंकृत केले. ऑस्ट्रेलियातील मगर आणि अजगराच्या लढतीचा अंगावर काटा आणणारे फोटोज सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

हे फोटो आहेत ऑस्ट्रेलियाच्या सर्वात मोठ्या ओलिव पाइथन चे जो ऑस्ट्रेलियाच्या ताज्या पाण्यातील मगरीला गिळत आहे. सोशल मिडियावर ह्या लढाईचे फोटो जबरदस्त व्हायरल होत आहेत. लोक हे फोटो पाहून अचंबित झाले आहेत की, मगरीचे दात आणि जबडा हा मोठा असूनसुद्धा एका अजगरासमोर कसा हारू शकतो. जर तुम्हाला आमच्यावर विश्वास बसत नसेल तर तुम्ही स्वत: ही छायाचित्रे पाहा

या छायाचित्रांना GG Wildlife Rescue Inc नावाच्या अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अजगर कसा हळूहळू मगरीला गिळत आहे हे स्पष्ट दिसत आहे. हे फोटो पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत.

हेही वाचा- अहमदनगर: हॉस्पिटलमध्ये रूग्णाच्या शर्टात विषारी साप; सर्पमित्रांच्या शक्कलीने सापाची सुरक्षित सुटका करून वाचवले प्राण (Watch Video)

हे फोटोज आतापर्यंत 18,000 लोकांनी बघितले केले असून 19,000 लोकांनी कमेंट्स तर 36,000 लोकांनी शेअर केले आहेत.