कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रसार जगभरात सुरु झाल्यापासूनच व्हायरस सोबतच खोट्या बातम्या (Fake News) सुद्धा वेगाने पसरत आहेत. असाच दावा करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये केलेल्या दाव्यानुसार कोरोना हा व्हायरस नसून केवळ एक बॅक्टरीया (Bacteria) आहे असे म्हंटले जातेय. इटालियन (Italy) पॅथॉलॉजिस्टने या आजाराने मृत्यू झालेल्या रूग्णांचे शवविच्छेदन करून हा शोध घेतल्याचे सांगितले गेलेय, हा एक बॅक्टरीया असल्याने त्याच्यावर ऍस्परिन (Aspirin) वापरून उपचार करता येईल असेही व्हायरल क्लिपमध्ये म्हटले आहे. पण हा व्हिडिओ बनावट आहे हे आता उघड झाले आहे. इतक्या प्रमाणात व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओ मध्ये करण्यात आलेला दावा आणि त्याचा आम्ही घेतलेले पडताळा आता आपण सविस्तर जाणून घेऊयात. Coronavirus In India: भारतामध्ये सलग तिसर्या दिवशी 24 तासांत वाढले 11 हजाराहून अधिक रूग्ण; पहा कोव्हिड 19 ची लागण झालेल्यांंचा एकूण आकडा
काय आहे हा व्हायरल व्हिडीओ?
इटली मधील पॅथोलॉजिस्टना असे आढळले की कोविड 19 हा हा एक व्हायरस नाही नाही तर एक विषाणू आहे. इटली मध्ये कोरोनाचा उद्रेक झाला असताना देशाने रूग्णांच्या उपचारांसाठी 100mg अॅस्पिरिनचा वापर सुरू केला होता. एस्पिरिन एक कृत्रिम कंपाऊंड आहे जे तीव्र वेदना आणि ताप कमी करण्यासाठी वापरले जातो.या ऍस्पिरीनचा वापर करून कोरोनावर उपचार शक्य असल्याचे सुद्धा व्हिडीओ मध्ये म्हंटले गेलेय. Fact Check: कोरोना व्हायरसची pH Value 5.5-8.5 असल्याने लिंबू, आंबा, संत्री खाऊन होणार उपचार?
हा व्हिडीओ इटलीने जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमाचे उल्लंघन न केल्याचे सांगण्याच्या उद्देशाने बनवलेला आहे. WHO तर्फे कधीच मृत रुग्णांवर पोस्टमोर्टम करू नये असे सांगण्यात आलेले नाही असे या व्हिडीओत ऐकू येते. सुरुवातीला, इटलीने कोविड 19 च्या मृत्यू झालेल्या रूग्णांवर शवविच्छेदन केले असता इटलीने कोरोना हा विषाणू नसून बॅक्टेरिया असल्याचा आरोप केला आहे. “हे रक्ताच्या गुठळ्या बनवते आणि ऑक्सिजन पुरवठा शरीरात पसरण्यापासून कमी करते,” असे सांगण्यात आले आहे. वास्तविक ही माहिती खोटी आहे.
@PMOIndia Sir please take a look at this video about Covid19 is only a bacteria not virus that Italy government has adopted this to save patient in their country if this is adopted in India as well pic.twitter.com/7zzyrW8g2Q
— gopi arun nadar (@gopi_nadar) June 13, 2020
व्हायरल व्हिडीओ मागे सत्य काय?
दरम्यान,कोरोना हा SARS-CoV-2, व्हायरस असल्याचे मागील कित्येक महिन्यांपासून सुरु असलेल्या संशोधनात स्पष्ट झाले आहे. शास्त्रज्ञ रोग आणि त्याच्या कारणांचा अभ्यास करीत आहेत. बर्याच प्रकरणांमध्ये, कोरोना रूग्णांना रक्त गोठण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो पण त्यावरून हा दावा करणे योग्य ठरणार नाही.
इटालियन आरोग्य मंत्रालयाने सुद्धा या व्हिडिओची पुष्टी केलेली नाही. “कोरोना व्हायरस वर विशिष्ट उपचार असल्याचे समोर आलेले नाही. कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी क्लिनिकल चाचण्याबाहेर अॅस्पिरिन वापरण्याचा उल्लेख केलेला नाही. याव्यतिरिक्त, 5 जी इलेक्ट्रॉनिक रेडिएशनमुळे व्हायरस खराब होतो असा दावा करणारा व्हिडिओ देखील चुकीचा आहे. डब्ल्यूएचओनुसार, कोरोनाव्हायरस रेडिओ वेव्हस / मोबाइल नेटवर्क माध्यमातून प्रवास करू शकत नाही असे समजतेय.