Viral Video: पहा समुद्रात 'व्हेल' मासा चक्क तरुणासोबत खेळतोय ‘कॅच-कॅच’!
व्हेल माशाचा व्हायरल व्हिडिओ ( Photo Credits: @ferrisjabr/ Twitter)

Viral Video: सध्या सोशल मीडियावर एका व्हेल माशाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये व्हेल (Whale) मासा चक्क एका तरुणासोबत 'कॅच-कॅच' खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ स्टॅन्स ग्राऊंड या व्यक्तीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये समुद्रातून मोटर बोटवरून प्रवास करत असताना या व्यक्तीने पाण्यात बॉल फेकला. त्यानंतर चक्क व्हेल माशाने या तरुणाचा बॉल आणून दिला. ग्राऊंड यांनी हा व्हिडिओ शेअर करताना 'प्लास्टिक वापरणे टाळा आणि अशा प्राण्यांचा जीव वाचवा. समुद्रात टाकलेले प्लास्टिक हे समुद्रातील प्राण्यांना घातक असते', असंही म्हटंल आहे. (हेही वाचा - बर्लिनची भिंत पडल्याचा आज 30 वा स्मृतिदिन: या महत्वाच्या ऐतिहासिक घटनेची आठवण करून देणारे खास Google Doodle)

स्टॅन्स ग्राऊंड यांचे ट्विट - 

न्यूझीलंड हेराल्डने दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ दक्षिण आफ्रिकन जेमिनी क्राफ्ट बोटवरील लोकांनी शुट केला आहे. तसेच हा व्हिडीओ 7 नोव्हेंबर रोजी शेअर करण्यात आला असून त्याचे आतापर्यंत सुमारे 5 मिलियन्स व्ह्यूज झाले आहेत.