सोशल मीडियावरील प्रसिद्ध अशा ट्वीटरच्या माध्यमातून जगातील दिग्गज मंडळी जसे बराक ओबामा, जोई बिडेन, जेफ बेझोस आणि बिल गेट्स यांच्यासारख्या अन्य जणांचे ट्वीटर हॅक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे नागरिकांना सध्याच्या डिजिटल युगात त्यांच्या डेटा सिक्युरिटीबाबत चिंता सतावू लागली आहे. या दिग्गज मंडळींचे अकाउंट्स बिटकॉइन स्कॅमर्सच्या माध्यमातून हॅक करण्यात आले होते. याच दरम्यान आता WhatsApp वर सुद्धा एक मेसेज वेगाने व्हायरल होत आहे. त्यात असा दावा केला जात आहे की, 'Argentina is doing it' नावाने एक व्हिडिओ फाइल सुरु केल्यास फोन10 सेकंदाच्या आतमध्ये हॅक होणार आहे.
WhatsApp मेसेज पाठवणाऱ्याने असे म्हटले आहे की, हॅकर्स एक व्हिडिओ व्हायरल करत आहेत. त्यात अर्जेंटिना मध्ये COVID19 चा प्रादुर्भाव कसा परसत आहे हे दाखवण्यात आले आहे. या फाइलचे नाव अर्जेंटिना डूइंग इट असे देण्यात आले आहे. त्यामुळे ती फाइल सुरु करु नका. कारण जर तुम्ही ती फाइल सुरु केल्यास अवघ्या 10 सेकंदात तुमचा फोन पूर्णपणे हॅक होणार आहे. असे झाल्यास ते तुम्ही थांबवू सुद्धा शकणार नाहीत. हा मेसेज परिवारातील सदस्य आणि मित्रांना सुद्धा पाठवा.(Twitter अकाउंट हॅकिंग होण्यापासून बचाव करण्यासाठी 'या' टीप्स जरुर लक्षात ठेवा)
Tweet:
There is a video circulating WhatsApp that shows how the Covid19 curve is flattening in Argentina. The file is called "Argentina is doing it", do NOT open it or see it, it hacks your phone in 10 seconds and it cannot be stopped in any way. RT!!
— ❂ VNESS ❂ (@OGvness) July 16, 2020
फॅक्ट चेक: LatestLY Fact Check LatestLY Fact Check यांच्या टीमने याबाबत अधिक तपास केला आहे. त्यानुसार असे समोर आले आहे की, अर्जेंटिना डूइंग इट ही फाइल पूर्णपणे खोटी आहे. यापूर्वी सुद्धा अशाच पद्धतीच्या बातम्या सोशल मीडियात व्हायरल झाल्या होत्या.