प्रत्येक व्यक्तीत एक वेगळं टॅलेंट असतं. या कौशल्याच्या आधारे प्रत्येकजण आपली वेगळी ओळख निर्माण करत असतो. परंतु, यातील अनेकजणांना कौशल्य असूनदेखील आपली वेगळी ओळख निर्माण करता येत नाही. ते कधीचं प्रकाशझोतात येत नाहीत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हे सर्व सांगण्यामागे कारणही तसचं आहे.
एका शेतकऱ्याने वाळलेल्या मकाच्या कणसाचे दाणे काढण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. हे जुगाड पाहुल उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) अवाक झाले आहेत. त्यांनी या शेकऱ्याच्या टॅलेंटचं कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. (हेही वाचा - PIB Fact Check: कोरोनाबाधित रुग्णांची यादी जाहीर केल्यास 3 महिन्यांसाठी तुरुंगवास होणार? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मॅसेजचा पीआयबीकडून मोठा खुलासा)
दरम्यान, आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती दुचाकीच्या टायरच्या साहाय्याने मक्याचे दाणे काढत आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे की, माझ्याकडे सतत नाविन्यपूर्ण व्हिडिओ क्लिप येत असतात. या व्हिडिओमध्ये शेतकरी गाडी आणि ट्रॅक्टरमध्ये काहीतरी कल्पक गोष्ट करत असतात. मात्र, दुचाकीचा अशा प्रकारचा वापर मी स्वप्नातही केला नाही, असंही आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे.
I constantly receive clips showing how creatively our farming communities turn bikes & tractor into multi-tasking machines. Here’s one application I never would have dreamed of. Maybe @continentaltire should have a special brand named ‘Corntinental?’ pic.twitter.com/rMj6rowA3L
— anand mahindra (@anandmahindra) August 27, 2020
या व्हिडिओमध्ये दुचाकी डबल स्टँडवर लावण्यात आली आहे. यात गाडीच मागच चाक जस फिरत आहे, तसं मकाचे दाणे खाली ठेवलेल्या कापडावर पडत आहेत. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरस होत आहे. अनेकांनी या शेतकऱ्याच्या टॅलेंटला सलाम केला आहे.