Amazon | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

आवश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी दुकानांबाहेर रांगा लावण्याचे प्रमाण आजच्या तंज्ञज्ञान युगात बरेच कमी झाले आहे. त्यात स्मार्टफोनने क्रांती केल्यापासून आणि अॅमेझॉन (Amazon), स्नॅपडील (Snapdeal ) यांसारख्या ऑनलाईन सेवा पुरवणाऱ्या कंपन्या सुरु झाल्यापासून तर हे प्रमाण आणखीच घटले. या कंपन्या ग्राहकाभिमूक सेवांसाठी प्रसिद्ध असल्या तरी कधी कधी त्यांच्या वेबसाईटवरुन सांगितले जाणारे वस्तूंचे दर आश्चर्यच नव्हे तर बोलती बंद करणारे ठरतात. अशाच एका गुलाबी बादलीमुळे (Amazon Selling Plastic Buckets)  अॅमेझॉन चर्चेत आले आहे. अॅमेझॉनवर विकली जाणारी ही बादली थोडीथोडकी नव्हे तर 26,000 रुपयांची असल्याचा दावा केला जातो आहे. एका ट्विटर युजरने ट्विटरवर शेअर केलेस्या स्क्रिनशॉटमुळे ही बादली अधिकच चर्चेत आली आहे.

ट्विटर युजरने ट्विटरवर शेअर केलेल्या स्क्रिनशॉटनुसार या बादलीची 26,000 रुपये ही किंमत तब्बल 28% डिस्काऊंट दिल्यानंतरची आहे. सोशल मीडियात या किमतीमुळे अॅमेझॉन चांगलेच ट्रोल होत आहे. दावा करण्या येत आहे की, अॅमेझॉनवर विकली जाणारी ही बातली इतर सामान्य बादल्यांप्रमाणेच दिसते. बाजारात अशा बादल्यांची किंमत 250 ते 350 रुपयांच्या आसपास आहे किंवा असते. मात्र, अॅमेझॉनवर दिसणारी ही गुलाबी रंगाची बादली मात्र चक्क 26,000 रुपयांना विकली जात आहे. (हेही वाचा, Amazon वर एक लाख रुपयांला विकला जातोय Mug! किंमत पाहून लोक झाले हैराण; जाणून घ्या काय खास आहे यात)

ट्विट

अॅमेझॉनवर या बादलीची वास्तविक किंमत 35,000 रुपये आहे. परंतू, 26% डिस्काऊंट दिल्यावर ही बादली 25,999 रुपये किमतीची झाली आहे. सुरुवातीला लोकांना वाटले की या बादलीची किमत चुकीची लिहीली आहे. परंतू लोकांनी काळजीपूर्वक पाहिले असता असे दिसून आले की, बादलीची किंमत खरोखरच तशी आहे. विशेष म्हणजे ही बातली कर्ज, किंवा क्रेडीटवरही दिली जाते. त्यासाठी प्रति महिना 1,224 रुपयांचा हप्ताही आकारला जातो. सोशल मीडियावर मात्र ही बातली सध्या थट्टेचा विषय झाली आहे.