![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/02/Aishwarya-Rai-And-Aamana-Imran--380x214.jpg)
बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हिच्या सारख्या हुबेहूब चेहरेपट्टीच्या पाकिस्तानी महिलेला पाहून सर्वजण सध्या शॉक झाले आहेत. आमना इमरान (Aamna Imran) असे नाव असून तिचे फोटो सुद्धा सोशल मीडिया तुफान व्हायरल होत आहेत. आमना इमरान ही अमेरिकेत राहत असून ती ऐश्वर्या राय हिची डुप्लिकेट असल्याची आता चर्चा सुरु झाली आहे. शुक्रवारी फोटोग्राफर विरल भयानी यांनी ऐश्वर्या आणि आमना हिचा फोटो शेअर केला आहे. त्यावर लोकांनी प्रतिक्रिया सुद्धा दिल्य आहेत.
ऐश्वर्या आणि आमना यांचा फोटो पाहिला असता एका युजर्सने म्हटले आहे की, प्रथमच जेव्हा हा फोटो पाहिला तेव्हा आमना ही सुद्धा ऐश्वर्याच वाटली. तर दुसऱ्याने म्हटले की, एका सेंकदासाठी मला सुद्धा दोघी सारख्याच असल्याचे भासले. तर आणखी एकाने म्हटले, ऐश्वर्या सारखे दिसण्यासाठी तिने प्लास्टिक सर्जरी केली असेल.(Saina Nehwal Biopic: बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा बायोपिक 'या' दिवशी होणार रिलीज; अभिनेत्री परिणीती चोप्रा दिसणार साइनाच्या भूमिकेत)
View this post on Instagram
तर आमना हिने असे म्हटले आहे की, सर्वांचे आभार. सर्वांच्या प्रेमासाठी धन्यवाद आणि मी कोणतीही सर्जरी केलेली नाही. आमना हिच्या आधी मराठी अभिनेत्री मानसी नाईक आणि अमृता सुद्धा ऐश्वर्या राय सारखी दिसत असल्याचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. अमृता ही टिकटॉकटच्या व्हिडिओसाठी प्रसिद्ध होते. त्यामध्ये ती ऐश्वर्यासारखाच मेकअप करत असे आणि ती एक मॉडेल असून ज्वेलरी ब्रँन्डमध्ये झळकताना दिसते.(Sara Ali Khan चा 'हा' ग्लॅमरस अंदाज पाहून चाहत्यांच्या खिळतील नजरा, See Pics)
View this post on Instagram
दरम्यान, ऐश्वर्या हिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती 2018 मध्ये आलेला चित्रपट 'फन्ने खा' मध्ये दिसून आली होती. या व्यतिरिक्त अनिल कपुर आणि राजकुमार राव यांनी सुद्धा त्यात मुख्य भुमिका साकारली होती. तर आगामी काळात ऐश्वर्या 'मणिरत्नम' मध्ये झळकणार असून त्याचे शूटिंग सध्या सुरु झाले आहे.