रानू मंडल यांचं 'तेरी मेरी कहानी' हे गाणं एका माणसासोबत गात आहे एक कुत्रा; व्हायरल झालेला हा व्हिडिओ सध्या नेटिझन्समध्ये घालत आहे धुमाकूळ
Dog Singing Ranu Mondal's song (Photo Credits: Facebook)

Video Of A Dog Singing Teri Meri Kahani:  गाण्याच्या रियाझामध्ये एक कुत्रा सामील होऊन स्वतःही सर्व करत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर भलताच धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ इतका मजेशीर आहे की तुम्ही तो पाहून लगेच दुसऱ्याला पण शेअर कराल. हिमेश रेशमिया याच्या हॅपी हार्डी आणि हीर या चित्रपटाची रानू मंडल यांनी गायलेल्या 'तेरी मेरी कहानी' या गाण्याचा रियाझ करताना एक माणूस दिसत आहे. त्याला फॉलो करत तिथेच बाजूला उभा असलेला कुत्रा देखील ते गाणं गाण्याचा प्रयत्न करतो.

फेसबुक युजर सुबीर खान यांनी आपल्या सोशल मीडिया हॅण्डल्सद्वारे हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये असलेला कुत्रा असं काय गाणं म्हणायचा प्रयत्न करतो जणू काय त्याला संगीतातील सगळंच येतं.

खान यांनी 30 सेकंदाची क्लिप फेसबुकवर शेअर केली आणि कॅप्शनमध्ये, "आज सकाळी बाघा आणि मी संगीताचा सराव केला," असे त्यांनी लिहिले. या व्हिडिओने फेसबुकवर दोन दशलक्षांहून अधिक व्ह्यूज पार केले आहेत आणि अजूनही लोक हा व्हिडिओ पाहणे थांबवू शकत नाहीत, काहींनी तर कमेंटमधून कुत्र्याला माणसापेक्षा अधिक हुशार देखील म्हटले आहे.

गगनयान मिशन: चंद्रावर जाणा-या भारतीय अंतराळवीरांसाठी प्रयोगशाळेत बनवले जात आहे खास पद्धतीचे जेवण; व्हेज पुलाव, व्हेज रोल्ससह अनेक पदार्थांचा समावेश

Ranu Mandal यांचं 'तेरी मेरी कहानी' हे गाणं एका माणसासोबत गात आहे एक कुत्रा Watch Video

दरम्यान, या व्हिडिओ मधील गाण्याच्या मूळ गायक रानू मंडल यांच्याविषयी बोलायचं झालं तर एक कोलकाताच्या एक प्लॅटफॉर्मवर राहणाऱ्या रानू या एक गाण्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये रातोरात स्टार बनल्या. हिमेश रेशमिया याने त्यांना आपल्या सिनेमात गाण्याची संधी दिली. त्याच्या सिनेमात त्यांनी ''तेरी मेरी कहानी' हे गाणं गायलं होतं.