रिझव्र्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध घातले असून, बँकेच्या खातेदारांना महिन्याभरासाठी 50 हजार रुपयांपर्यंतच रक्कम काढता येणार आहे. यामुळे बॅंकेच्या खातेदारांची पैसे काढण्यासाठी धावधाव सुरु आहे. महत्वाचे म्हणजे, गेल्या दोन दिवसांपासून नेट बँकिंग, मोबाइल ऍप, डेबिट आणि क्रेडीट कार्ड, चेक क्लिअरिंग आणि एटीएम सेवा पूर्णपणे खंडीत करण्यात आली होती. यामुळे येस बॅंकेतील ग्राहकांना अर्थिक व्यवहार करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. यातच ग्राहकांना आता एटीएममधून पैसे काढता येणार असे ट्वीट येस बॅंकेने केले असून खातेदारांच्या झालेल्या गैरसोयबदल खंत व्यक्त केली आहे. सध्या येस बॅंकेतील खातेदार चिंतेत आहेत. दरम्यान, येस बॅंकेतील खातेदारांचे पैसे बुडणार नाहीत, असे आश्वासन अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी दिले आहे.
रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांनुसार येस बँकेचे खातेदार महिनाभरात एकदाच 50 हजारांपर्यंत रक्कम काढू शकतात. त्यामुळे देशभरातील येस बँकेच्या शाखांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली आहे. मुंबईत देखील शाखांमध्ये ग्राहकांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. मात्र, 2 दिवसांपासून बँकेची नेट बँकिंग, मोबाइल ऍप, डेबिट आणि क्रेडीट कार्ड, चेक क्लिअरिंग आणि एटीम सेवा पूर्णपणे खंडीत झाल्याने ग्राहकांनासमोर ही मोठी समस्या निर्माण झाली होती. आज मध्यरात्री येस बॅंकेने ट्वीट करत ग्राहकांना काहीसा दिलासा दिला आहे. हे देखील वाचा- YES Bank Crisis: येस बॅंकेच्या ग्राहकांना आणखी एक धक्का; डिजिटल व्यवहार, एटीएम सेवा पूर्णपणे खंडीत झाल्याने खातेदारांची चिंता वाढली
येस बॅंकेचे ट्विट-
You can now make withdrawals using your YES BANK Debit Card both at YES BANK and other bank ATMs. Thanks for your patience. @RBI @FinMinIndia
— YES BANK (@YESBANK) March 7, 2020
येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या वरळीतील 'समुद्र महल' घरावर ईडीने शुक्रवारी संध्याकाळी छापा टाकला. राणा कपूर यांच्यावर ईडीने मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच राणा कपूर यांच्याविरोधात लूक आऊट नोटीसही बजावण्यात आली आहे. त्यामुळे कपूर यांना देश सोडून जाता येणार नाही. राणा कपूर यांच्यावर डीएचएलएफला कर्ज दिल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.