Death | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

यवतमाळ (Yavatmal) शहरातील एका कार्यक्रमात उपस्थितांच्या काळजाला चटका लावणारी एक धक्कादायक घटना घडली. आपल्या प्राचार्य पत्नीच्या सेवानिवृत्ती सोहळ्यास (Retirement Program) उपस्थित असलेल्या निवृत्त कृषी अधिकारी पतीचा भर कार्यक्रमातच मृत्य झाला. कार्यक्रम सुरु असतानाच पतीला व्यासपिठावर भोवळ आली आणि ते खाली कोसळले. उपस्थितांनी धावाधाव करत त्यांना मदत करणयाचा प्रयत्न केला. मात्र, सर्वांच्या डोळ्यादेखत त्यांचा मृत्यू झाला. विकास महाजन असे मृताचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, डॉ. रेखा महाजन या जिल्हा व प्रशिक्षण संस्थेत पाठीमागील अनेक वर्षे प्राचार्य म्हणून कार्यरत होत्या. 31 मार्च रोजी त्या सेवानिवृत्त झाल्या. त्या निमित्ताने सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात महाजन पती पत्नींच्या हस्ते पीचएडी प्राप्त शिक्षकांचा सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमस्थळी उत्साह ओसांडून वाहात होता. अशा वेळी अचानक महाजन यांना भोवळ आली आणि ते खाली कोसळले. (हेही वाचा, Suicide: नोकराणीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी घरमालक अटकेत)

विशेष म्हणजे मृत्यू होण्यापूर्वी विकास महाजन यांनी शिक्षकांसमोर मार्गदर्शनपर भाषणही केले. भाषण करुन ते मंचावर येऊन बसले आणि त्याच क्षणी त्यांना भोवळ आली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रस्त्यामध्येच त्याची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषीत केले. या कार्यक्रमावेळी महाजन दाम्पत्याच्या दोन्ही मुली आणि मुलगा कार्यक्रमास उपस्थित होते. याशिवाय नातवंडेही आजी आजोबांचा सत्कार पाहण्यासाठी उपस्थित होती. मात्र, उत्साहाच्या क्षणी त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.