Suicide प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

Bullying in School: आराध्या पांडे नावाच्या एका 14 वर्षीय मुलाने आत्महत्या (Aradhya Suicide Case) केली आहे. ही घटना लखनऊ येथील आलमबाग पोलीस ठाणे (Alambagh Police Station) आवारात घडली. पीडित मुलाचे वडील आलोक पांडे हे याच पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल आहेत. घटना घडली तेव्हा संपूर्ण पांडे कुरुंटब पोलिस ठाण्याच्या आवारातच राहात होते. आराध्याच्या वडीलांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्गमित्रांकडून सातत्याने होणाऱ्या छळाळा कंटाळून त्याने आत्महत्या केली आहे. त्याच्या वर्गातील काही मुले त्यास सातत्याने चिडवत असत त्यामुळे तो पाठीमागील अनेक दिवसांपासून अस्वस्थ होता.

वडिलांच्या तक्रारीत आठ अल्पवयीनांची नावे

आलोक पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मित्रांकडून सतत होणाऱ्या छळामुळे आराध्या भावनिकदृष्ट्या अस्वस्थ होता. त्यातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणात वडील पांडे यांनी रविवारी औपचारिक तक्रार दाखल केली, ज्यामध्ये आराध्याच्या वर्गमित्रांसह आणि शाळेबाहेरील इतर ओळखीच्या लोकांसह आठ अल्पवयीन मुलांची नावे त्यांच्या मुलाच्या मृत्यूच्या संदर्भात संशयित म्हणून नोंदवली. अधिकाऱ्यांशी बोलताना, आलोक पांडे यांनी त्यांच्या मुलाला मिळालेल्या कोणत्याही धमकीच्या संदेशांची सामग्री उघड न करण्याचा निर्णय घेतला. कथित छळाचे स्वरूप आणि स्रोत पडताळण्यासाठी सध्या तपास सुरू आहे.  (हेही वाचा, Dog Attack In Ahmedabad: रॉटविलर कुत्र्याचा 4 महिन्यांच्या मुलीवर हल्ला; चिमुरडीचा मृत्यू, पहा व्हिडिओ)

तक्रारीत नाव देण्यात आलेले सर्व आठही जण अल्पवयीन आहेत आणि स्थानिक कायदा अंमलबजावणी संस्थांकडून हे प्रकरण संवेदनशीलतेने हाताळले जात आहे. आलोक पांडे सध्या अ‍ॅडव्होकेट जनरलच्या सुरक्षा विभागासाठी नियुक्त केलेल्या एस्कॉर्ट टीमचा भाग आहेत. पोलिस सूत्रांनी सांगितले की, सविस्तर चौकशी सुरू आहे आणि प्राथमिक तपास पूर्ण झाल्यानंतर अधिक माहिती जाहीर केली जाईल. या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल आणि गुंडगिरीशी संबंधित घटनांमध्ये प्रभावी हस्तक्षेप करण्याची गरज याबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे.

अन्याय अत्याचाराविरोधा माहिती आणि मदत

महिला आणि लहान मुले यांच्यावरील कोणत्याही प्रकारच्या अन्याय, अत्याचार यांची तक्रार करण्यासाठी आणि मदत मिळवण्यासाठी सेवा उपलब्ध असतात. फक्त आपण तिथपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असते. स्वत:बद्दल किंवा पीडिताबद्दल माहिती देणे आणि मदत मिळविणे यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधून मदत मिळवा:

महिला आणि बाल हेल्पलाइन क्रमांक:

चाइल्डलाइन इंडिया: 1098; हरवलेली मुले आणि महिला: 1094; महिला हेल्पलाइन: 181; महिला हेल्पलाइनसाठी राष्ट्रीय आयोग: 112; राष्ट्रीय महिला आयोग हिंसेविरुद्ध हेल्पलाइन: 7827170170; महिला आणि ज्येष्ठ नागरिक पोलीस हेल्पलाइन: 1091/1291.