
दिल्ली मधील Jawaharlal Nehru University अर्थात JNU कडून Turkiye च्या Inonu University सोबत असलेला शैक्षणिक सामंजस्य करार रद्द करण्याची घोषणा केली आहे. 'राष्ट्रीय सुरक्षे'चं कारण पुढे करत त्यांनी हा शैक्षणिक सामंजस्य करार रद्द करण्याची घोषणा केली आहे. पुढील नोटीसीपर्यंत हा करार रद्द असेल असे त्यांनी X पोस्ट वर सांगितले आहे. दरम्यान हा सामंजस्य करार 3 फेब्रुवारी रोजी तीन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आला होता.
भारताच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानला पाठिंबा दिल्याबद्दल तुर्कीविरुद्ध वाढत असलेल्या भारतीयांच्या प्रक्षोभाच्या पार्श्वभूमीवर जेएनयूने हे पाऊल उचलले आहे. Ankara आणि Azerbaijan या देशांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांवर भारताच्या हल्ल्यावर टीका केली आहे. भारतीय लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य करण्याच्या अयशस्वी प्रयत्नात इस्लामाबादने Turkish Kamikaze drones चा वापर केला होता. नक्की वाचा: भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकला मदत करणार्या Azerbaijan, Turkey च्या पर्यटनावर भारतीयांचा बहिष्कार; 250% सहली रद्द .
JNU - Inonu University, Turkey मधील शैक्षणिक सांमजस्य करार रद्द
Jawaharlal Nehru University (JNU) tweets "Due to National Security considerations, the MoU between JNU and Inonu University, Turkey stands suspended until further notice." pic.twitter.com/SsuEZIPZ6B
— ANI (@ANI) May 14, 2025
भारताविरुद्ध पाकिस्तानला पाठिंबा देण्याच्या तुर्कीच्या निर्णयाचा भारतात मोठ्या प्रमाणात निषेध सुरू आहे. व्यापाऱ्यांनी पश्चिम आशियाई देशातील उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आणि प्रवास कंपन्यांनी या देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना केल्या आहेत.
महाराष्ट्रातील पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्की सफरचंदांवर "बहिष्कार" घालण्याचे आवाहन केल्यानंतर काही दिवसांनी, उत्तर प्रदेशातील अनेक विक्रेत्यांनीही या निर्णयाचे अनुकरण केले आणि पाकिस्तानला पाठिंबा दिल्याचा निषेध करण्यासाठी तुर्कीशी सर्व व्यावसायिक संबंध तोडले आहेत.