व्हिडिओ: काँग्रेस नेते हरीभाऊ राठोड यांचे पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल अनुद्गार; सर्जिकल स्ट्राईकमध्ये मुंगीही मेली नसल्याचा दावा
Congress MLC Haribhau Rathod (फोटो सौजन्य-एएनआय)

यवतमाळ (Yavatmal) येथील आयोजित कार्यक्रमात जाहीर भाषण करत असताना काँग्रेस नेते हरिभाऊ राठोड (Congress MLC Haribhau Rathod) यांनी सर्जिकल स्ट्राईक 2 आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका केली. ही टीका करत असताना राठोड यांची जीभ घसरल्याचे उपस्थितांना पाहायला मिळाला. एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या चित्रफीतीत (व्हिडिओ) राठोड यांनी केलेली टीका आणि मोदींबद्दल काढलेले अनुद्गार स्पष्टपणे ऐकायला मिळत आहेत.

भारताने पाकिस्तानविरोधात सर्जिकल स्ट्राईक केला. परंतू, या स्ट्राईकमध्ये साधी मुंगीही मेली नाही. सरकार मात्र यात स्ट्राईकमध्ये शेकडो दहशतवादी मेल्याचे सांगते. हा दावा खोटा असून, केवळ जनतेचे लक्ष वळविण्यासाठीच सरकारने हा स्ट्राईक केलेल्याचे नेते राठोड या वेळी म्हणाले. दरम्यान, सरकार जनतेच्या भावनेला हात घालण्यासाठी अशी प्रकार करत असल्याचा आरोपही राठोड यांनी केला. (हेही वाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य; काँग्रेस नेते शशी थरुर विरुद्ध केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद सामना रंगला)

दरम्यान, लोकांच्या भावनेला हात घालायचा. मूळ प्रश्नांपासून त्यांचे लक्ष विचलीत करायचे आणि पुन्हा मोदी... मोदी.... अशा घोषणा द्यायच्या असा हा प्रकार असल्याचे सांगतानाच राठोड यांची जीभ घरसली आणि त्यांनी मोदींबद्दल अनुद्गार काढले.