Y Security to Narayan Rane: नारायण राणे यांना केंद्र सरकारकडून Y दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय
नारायण राणे (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Y Security to Narayan Rane: महाविकास आघाडी सरकारने काही दिवसांपूर्वीच राज्यातील काही नेत्यांची सुरक्षितता कमी केल्याचे दिसून आले आहे. यामध्ये भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, चंद्रकांत पाटील, रामदास आठवले यांच्यासह अन्य काही जणांचा या मध्ये समावेश असून त्यांची सुरक्षा महाराष्ट्र पोलिसांकडून काढण्यात आली आहे. अशातच आता केंद्र सरकारने नारायण राणे यांना Y सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

नारायण राणे यांना केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या Y सुरक्षतेत 12 सीआयएसएफचे जवान असणार आहेत. तर महाविकास आघाडी सरकारने नारायण राणे यांची सुरक्षा कपात केल्यानंतर केंद्राने हा निर्णय घेण्यात आल्याने अधिक चर्चा सुरु झाली आहे. तर भाजप नेत्यांच्या सुरक्षेत घट केल्यानंतर त्यांनी आपले मत व्यक्त केले होते. तसेच सुरक्षा काढून घेतल्याने आम्ही घाबरत नाही अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली होती.(महाविकास आघाडी सरकारकडून भाजप नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात; चंद्रकांत पाटील यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया)

याआधी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सनी देओल यांना Y सिक्युरिटी दिली गेल्याची बातमी समोर आल्यानंतर काही लोकांनी त्याला विरोध दर्शवला. परंतु या संदर्भातील रिपोर्ट्स बद्दल सनी देओल याने स्पष्टीकर देत म्हटले की, दाखवल्या जाणाऱ्या बातम्या किंवा रिपोर्ट्स हे चुकीचे आहेत. पुढे सनी याने असे ही म्हटले त्याला जुलै 2020 पासूनच Y सुरक्षा दिली गेली आहे.(Maha Govt Reduces Security of Raj Thackeray: राज ठाकरे यांची सुरक्षा काढून घेणे हे सरकारचे घाणेरडे राजकारण आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया)

तर 'Y+' सुरक्षा ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सुरक्षा व्यवस्था आहे. या Y दर्जाच्या सिक्युरिटी मध्ये एकूण 11 कर्मचारी असतात. ज्यात 1 किंवा 2 कमांडो आणि बाकी पोलीस कर्मचारी संबधित व्यक्तीच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडतात. यामध्ये 2 पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर सुद्धा असतात.