चंद्रकांत पाटील (Photo credit : facebook)

महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील राजकारणाने चांगलाच पेट घेतला आहे. या निर्णयावरून भाजपकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. यावर आता स्वत: चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे. मात्र, राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे सरकारवर कुरघोडी करताना ही कमी केलेली सुरक्षा व्यवस्था महिलांच्या सुरक्षेसाठी वापरा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

" त्या काळात आवश्यकतेनुसार या सुरक्षा व्यवस्था देण्यात आल्या होत्या. मात्र, त्या व्यवस्था राज्यसरकारने काढून घेतल्या आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. परंतु, महाराष्ट्रात महिला असुरक्षित आहेत. यामुळे ही काढलेली सुरक्षा महिलांसाठी वापरण्यात यावी, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. तसेच राज्य सरकारने सुरक्षा काढल्यामुळे आमचा प्रवास थांबेल, आम्ही घाबरू अशी सरकारची कल्पना असेल तर, असे होणार नाही. आम्ही चळवळीतीलच माणस आहोत. त्यामुळे सुरक्षा काढल्याने काही आम्ही घाबरत नाही", असेही त्यांनी म्हंटले आहे. हे देखील वाचा- CM Uddhav Thackeray Visit Bhandara District Hospital: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दौरा वेळापत्रक, भंडारा जिल्हा रुग्णालय पाहणी करणार, घेणार पीडितांची भेट

देवेंद्र फडणीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुलगी दिवीजा फडणवीस यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. अमृता फडणवीस यांना पूर्वी वाय दर्जाची सुरक्षा होती. आता त्यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री आणि रिपाइंचे नेते रामदास आठवले, भाजप आमदार आशिष शेलार, दिपक केसरकर यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला अॅड. उज्ज्वल निकम आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे.