CM Uddhav Thackeray Visit  Bhandara District Hospital: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  दौरा वेळापत्रक, भंडारा जिल्हा रुग्णालय पाहणी करणार, घेणार पीडितांची भेट
CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) आज भंडारा (Bhandara ) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते भंडारा जिल्हा रुग्णालयास ( Bhandara District Hospital) भेट देणार आहेत. या रुग्णालयात शुक्रवारी (9 जानेवारी 2020) मध्यरात्री आग लागली होती. या आगीत 10 बालकांचा मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे आज या रुग्णालयाची पाहणी करतील तसेच दुर्घटनेतील पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आजचा नियोजित दौरा पुढील प्रमाणे राहणार आहे.

कसा असे मुख्यमंत्र्यांचा दौरा?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सकाळी 10.10 वाजता शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावरुन सांताक्रूझ विमानतळाकडे रवाना होतील. 11.00 वाजता ते विमानाने नागपूरला रवाना होतील. 12.15 वाजता त्यांचे विमान नागपूर विमानतळावर पोहोचेल. त्यानंतर 12.15 वाजता ते हेलिकॉप्टरने शहापूरला निघतील. 12.40 वाजता भंडारा येथील दुर्घटनेतील पीडित बालकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन घटनास्थळाचे निरीक्षण करतील. (हेही वाचा, Fire at Bhandara District Hospital: भंडारा दुर्घटनेच्या चौकशीसाठी सहा सदस्यीय समिती गठीत- राजेश टोपे)

काय आहे प्रकरण?

भंडारा जिल्ह्यासाठी शनिवारची पाहाट काळरात्र ठरली. रात्रीच्या नीरव अंधारात सर्व काही निद्राधीन असताना काळाने घाला घातला. भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशु केअर युनिटला आग लागली. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेत 10 बालकांचा मृत्यू झाला.7 बालकांना वाचविण्यात यश आले. रात्री दोन वाजनेच्या सुमारास ही घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, राज्य सरकारने या घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल प्रतिक्षेत आहे. (हेही वाचा, Fire at Bhandara District Hospital: भंडारा जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री विश्वजित कदम, अमित शाह, राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या भावना)

या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री विश्वजित कदम यांच्यासह राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांनी दु:खद भावना व्यक्त केल्या. तसेच, राज्य सरकार म्हणून या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच, पंतप्रदान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यास राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अनेक राजकीय नेत्यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले.