Fire at Bhandara District Hospital: भंडारा जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री विश्वजित कदम, अमित शाह, राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या भावना
Fire at Bhandara District Hospital | (Photo Credits: ANI)

भंडारा (Bhandara ) जिल्ह्यासाठी शनिवारची (9 जानेवारी 2021) पाहाट काळरात्र ठरली. रात्रीच्या नीरव अंधारात सर्व काही निद्राधीन असताना काळाने घाला घातला. भंडारा जिल्हा रुग्णालयातील (Fire at Bhandara District Hospital) शिशु केअर युनिटला आग लागली. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेत 10 बालकांचा मृत्यू झाला. रात्री दोन वाजनेच्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) , राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope), भंडारा जिल्हा पालिकमंत्री विश्वजित कदम (Vishwajeet Kadam), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपल्या भावाना व्यक्त केल्या आहेत.

संपूर्ण घटनेच्या तत्काळ चौकशीचे आदेश - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत, असे ट्विट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे. (हेही वाचा, Bhandara Fire: भंडारा जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा दुर्दैवी अंत)

भंडारा जिल्हा रुग्णालय आगीच्या घटनेबद्दल पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आगीच्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी मोदींना ट्विट केले की, “ महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा रुग्णालयात घडलेली घटना ही दु:खद होती. नवजात बालकांचे प्राण आपण गमावले.

बालकांच्या कुटुंबीयांना प्रतेकी 5 लाख रुपयांची मदत- राजेश टोपे

भंडारा जिल्हा रुग्णालयात घडलेली आगीची घटना अत्यंत भयावह आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या बालकांच्या कुटुंबीयांना प्रतेकी 5 लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्याबाबतचे आदेश देण्यात आल्येचेही त्यांनी म्हटले आहे.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील घटना दुर्दैवी- अमित शाह

भंडारा जिल्हा रुग्णालयात, महाराष्ट्रातील भीषण अपघात दुर्दैवी आहे. मी शब्दांच्या पलीकडे दु: खी आहे. माझे विचार आणि शोक शोकग्रस्त कुटुंबांसमवेत आहेत. ही अतुलनीय नुकसान सहन करण्याची शक्ती देव त्यांना देईल, अशा भावान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केल्या आहेत.

भंडारा जिल्हा रुग्णालय आग घटना वेदनादाई- राहुल गांधी

महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात आग लागल्याची दुर्दैवी घटना अत्यंत वेदानादाई आहे. आपला जीव गमावलेल्या मुलांच्या कुटूंबियांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करावी असे मी आवाहन करतो, असे ट्विट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे.

कारवाईचे आदेश- पालकमंत्री विश्वजित कदम

भंडारा जिल्हा रुग्णालयात घडलेल्या घटनेत मृत्यू झालेल्या बालकांना त्यांच्या कुटुंबीयांना पाहूदेखील दिले जात नाही, अशी तक्रार करण्यात येत होती. संबंधित घटनेची चौकशी करुन माहिती द्यावी. तसेच, मृत बालकांना त्यांच्या कुटुंबीयांना पाहू द्यावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. काही वेळातच त्यावर कारावाई होईल, अशी प्रतिक्रिया भंडारा जिल्हा पालकमंत्री विश्वजित कदम यांनी दिली आहे.

दोषींवर कारवाई व्हावी- देवेंद्र फडणवीस

भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत सुमारे 10 बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी!, अशी मागणी राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी केली आहे.