महाराष्ट्रासाठी शनिवारची (9 जानेवारी) पहाट दुर्दैवी ठरली आहे. भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात (Bhandara Hospital Fire) मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. या अग्नितांडवात 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. याच घटनेच्या चौकशीसाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती शासनाला 3 दिवसात अहवाल सादर करेल. तसेच याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले आहे.
"भंडारा जिल्ह्यातील रुग्णालयाच्या जळीत प्रकरणातील बालकांच्या मृत्यूच्या घटनेच्या चौकशीसाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून ही समिती शासनाला तीन दिवसात अहवाल सादर करेल,बेफिकिरी दाखवणाऱ्या तसेच दोषी असणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल", अशा आशयाचे ट्विट राजेश टोपे यांनी केले आहे. हे देखील वाचा- Fire at Bhandara District Hospital: भंडारा जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री विश्वजित कदम, अमित शाह, राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या भावना
ट्विट-
रुग्णालयाच्या जळीत प्रकरणातील बालकांच्या मृत्यूच्या घटनेच्या चौकशीसाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून ही समिती शासनाला तीन दिवसात अहवाल सादर करेल,बेफिकिरी दाखवणाऱ्या तसेच दोषी असणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. pic.twitter.com/o7s6NNE1xU
— Rajesh Tope (@rajeshtope11) January 9, 2021
भंडारा जिल्हा रुग्णालयाला राजेश टोपे आज दुपारी भेट दिली होती. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम, नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम, आरोग्य उप संचालक डॉ. संजय जायस्वाल यावेळी उपस्थित होते.