पेट्रोल काही पैशांनीच स्वस्त (संग्रहित, संपादित प्रतिमा)

सर्वसामान्य जनतेसह देशातील दळणवळण आणि आर्थिक चढ-उताराशी संबंधीत असलेल्या डिझेल, पेट्रोलचे दर जनतेला अल्पसा दिलासा देऊ लागले आहेत. रुपयांमध्ये वाढणारे दर आज (शुक्रवार, २६ ऑक्टोबर) नवव्या दिवशीही काही पैशांनी स्वस्त झाले. राज्याची राजधानी मुंबईत पेट्रोल, डिझेलचे दर प्रतिलीटर अनुक्रमे २५ पैसे आणि आठ पैशांनी उतरले. त्यामुळे मुंबईत पेट्रोल ८६. ३३ रुपये तर डिझेल ७८. ३३ रुपये प्रतिलीटर दराने मिळत आहे. दरातील हा उतार पाहून जनतेला समाधान न देणारा दिलासा, अशी प्रतिक्रिया ग्राहकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, दिल्लीत पेट्रोल ८०. २५ रुपये आणि डिझेल ७४. ७३ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे.

आंतरराष्ट्री तेल बाजारात कच्चा तेलाच्या किमती उतरल्या आहेत. या संधीचा फायदा तेल कंपन्यांना मिळत असून, या कंपन्या हा फायदा प्रतिलीटर काही पैसे कमी करुन ग्राहकांपर्यंतही पोहोचवत आहेत. पेट्रोल, डिझेलचे प्रतिलीटर रुपयांमध्ये वाढलेले दर काही पैशांनी कमी होण्याची कासवगती आज सलग नवव्या दिवशीही सुरु आहे. (हेही वाचा, वाहनचालकांसाठी खुशखबर ; डिझेलसाठी मिळणार कर्ज)

प्राप्त माहितीनुसार राज्यातील विविध शहरांतील पेट्रोल, डिझेलचे दर

पुणे: पेट्रोल – ८६. १३ रुपये, डिझेल- ७६. ९० रुपये

नागपूर: पेट्रोल – ८६. ८१ रुपये, डिझेल – ७८. ८६ रुपये

औरंगाबाद: पेट्रोल – ८७. ३८ रुपये, डिझेल – ७९. ३९ रुपये