पेट्रोल-डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढतच आहेत. (Photo Credits: PTI)

काही दिवसांपूर्वी केंद्र सराकारने पेट्रोल- डिझेलच्या किंमती कमी करणार असल्याचा गाजावाजा केला होता. त्यानंतर डिझेल 2.50 पैशांनीच स्वस्त केले, तर काही दिवसांनंतर ही परिस्थिती पूर्ववत होत डिझेल 2.51 पैशांनी महागले आहे. त्यामुळे सरकारने केलेल्या घोषणे बद्दल नागरिक संताप व्यक्त करत आहेत. त्यामुळे आता नागरिकांना कर्ज घेऊन डिझेल भरण्याची वेळ आली असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच महाराष्ट्रात काही राज्यांनी पेट्रोलवरीव व्हॅट अडिच रुपयांनी केला असला तरीही डिझेलवरील व्हॅट कमी करण्यात आलेला नाही आहे.

केंद्र सरकारने पेट्रोल- डिझेलच्या बाबतीतील दर वाढ कमी केली होती. मात्र अवघ्या 10 दिवसांतच त्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सोमवारी मुंबईत डिझेल 79.11 रुपये तर पेट्रोल 8.11 रुपये झाले आहे. त्यामुळेच पेट्रोल- डिझेलच्या दररोजच्या वाढत्या किंमतीमुळे तामिळनाडूतील एका खासगी बँकेने वाहनचालकांसाठी चक्क डिझेलसाठी कर्जाची योजना आणली आहे. ''स्मायलेज'' असं या योजनेचे नाव असून प्रायोगिक तत्वावर तिरुप्पूर येथे चालू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत वाहनचालकांना डिझेलसाठी 100 रुपयांच्या कर्जावर 1.50 रुपये व्याज द्यावे लागणार आहे.

या योजनेचा लाभ वाहतूक धारकांना हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपावर घेता येणार आहे. तर मालवाहतूकदारांना या ''स्मायलेज कर्ज'' योजनेचा मोठा फायदा होणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे.