
लग्नाचे आमिष दाखवून हेडकॉन्स्टेबलकडून (Head Constable) विधवा महिलेचे (Widow woman) लैंगिक शोषण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नागपूरमधील (Nagpur) लकडगंज पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. राजेश वसंतराव मेहर, असं या हेडकॉन्स्टेबलचं नाव आहे. राजेश यांच्यावर एका 44 वर्षीय महिलेला लग्नाचे अमिष दाखवून तिचे लैगिंक शोषण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. राजेश मेहर हे नागपूरमध्ये पोलिस मुख्यालयात कार्यरत आहेत.
पीडित महिला आणि राजेश मेहर यांची 2015 मध्ये ओळख झाली होती. राजेशने पीडित महिलेल्या आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. पीडित महिलेच्या मुलीचं लग्न करून देईल, असं आश्वासनही दिलं. त्यानंतर राजेसने पीडित महिलेला घरखर्चासाठी आणि मुलीच्या शिक्षणासाठी पैसे दिले. (हेही वाचा - भंडारा: पोलिस शिपायाची सासुरवाडीत तलावत उडी घेऊन आत्महत्या)
दरम्यान, काही दिवसानंतर पीडित महिलेने त्याला लग्नाची गळ घातली. त्यानंतर राजेशने महिलेला एका मंदिरात नेले. तेथे तिच्यासोबत लग्न केले. त्यानंतर त्याने तिचे लैंगिक शोषण केले आणि पीडित महिलेशी संबंध तोडून टाकले. या सर्व प्रकारानंतर पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी पीडित महिलेची दखल घेतली नाही म्हणून तिने न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना तक्रार दाखल करून देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, राजेशवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.