भंडारा (Bhandara) जिल्ह्यामधील लाखनी तालुक्यातील इसापूर येथे एका पोलिस शिपायाने (Police Constable) सासुरवाडीला येऊन गावाजवळच्या तलावत उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. अंकुश श्रीराम बडगे, असं या शिपायाचं नाव आहे. मानसिक तणावातून पोलिस शिपायाने आपलं जीवन संपवलं आहे. या घटनेमुळे इलापूर गावात खळबळ उडाली आहे.
अंकुश बडगे हे हिंगोली जिल्ह्यातील नरसी या पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई या पदावर कार्यरत होते. ते गेल्या महिन्याभरापासून आपली सासुरवाडी इसापूर येथे राहत होते. परंतु, अंकुश गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी इसापूर येथील तलावात शनिवारी मध्यरात्री तलावात उडी घेतली. (हेही वाचा - 'वय 80 वर्षे असले तरीदेखील माझे विचार मात्र तरूणच' तरूणाईशी संवाद या क्रार्यक्रमातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे दिलखुलास उत्तर)
आज सकाळी अंकुश यांचा मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेत तो जवळच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, अंकुश यांच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी पोलिस अधिक तपास करत आहेत.