नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसकडून (National Congress Party) तरूणाईशी संवाद या कार्यक्रमाचे मुंबई (Mumbai) येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी तरूणाईशी संवाद या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रश्नांनाही शरद पवार यांनी दिलखुलास उत्तर दिले आहे. माझे वय 80 झाले असले तरी, विचार करण्याची पद्धत जुनी नाही, असे शरद पवार हे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते. तरुणाईशी संवाद हा आगळा वेगळा कार्यक्रम असून, संवाद साधण्यासाठी मी येथे आलो आहे. याचा मला आंनद वाटत आहे. तुमची पीढी आणि माझी पीढी यात किती अंतर आहे हे मला जाणून घ्यायचे आहे. असेही शरद पवार म्हणाले आहेत.

शरद पवार यांनी गेले अनेक वर्षे राजकारणात घातली आहेत. तसेच त्यांचा अनुभवही इतरांपेक्षा अधिक आहे. हे आपण विधानसभा निवडणुकीत पाहिलाच आहे. हाच अनुभव शरद पवार यांनी तरूणाईशी संवाद या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या समोर मांडला आहे. दरम्यान, शरद पवार म्हणाले की, गेल्या 52 वर्षापूर्वी मी विधानसभेवर आमदार झालो होतो. 50 वर्षात अनेक घटना घडल्या, अनेक संधीही मिळाल्या आहेत. एका गोष्टीचे समाधान आहे की, कोनाकोपऱ्यातील मला 'वय 80 वर्षे असले तरीदेखील माझे विचार मात्र तरूण' तरूणाईशी संवाद या क्रार्यक्रमातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे दिलखुलास उत्तरयुवकांशी संपर्क साधण्याची संधी मिळाली आहे. जेव्हा मी कॉलेजला होतो त्यावेली अभ्यास सोडून सगळ्यात भाग घ्यायचो. महाविद्यालयातील निवडणूक कशी जिंकता येतील, याकडे अधिक लक्ष दिले. हेच माझ्या सार्वजनिक जीवनाचे ऐकमेव कारण आहे. मी आजूनही माझ्या जुन्या मित्रांना भेटतो. त्यांच्याशी संवाद साधतो. मला असे वाटते की, देशाचे भवितव्य घडवण्याची युवकांमध्ये ताकद आहे. या तरूणांना संधी मिळायला पाहिजे. हे देखील वाचा- नवी मुंबई: गणेश नाईक यांना मोठा धक्का; मुद्रीका गवळी, सुरेश कुलकर्णी, यांच्यासह 4 भाजप नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

ट्वीट-

तसेच एकंदर परिस्थिती लक्षात घेतली असता अभ्यासक्रमामध्ये बदलाची आवश्यकता आहे. या आभ्यासक्रमात बदल करण्यात आला पाहिजे. लोकशाहीत काहीही घडू शकते. उत्तर प्रदेशात नेते निवडून आले त्याकडे लक्ष द्या. चुकीच्या लोकांना बाजूला ठेवा, त्यांना निवडून देऊ नका. माझे स्वच्छ मत आहे की, कॉलेजमध्ये निवडणुका पुन्हा सुरु करण्याची काळजी घ्यावी. कॉलेज तरूणांना संधी मिळायला आहे. यातूनच चांगला पुढारी समोर येतो, हे कोणीही विसरता कामा नये, असेही शरद पवार म्हणाले आहेत.