Maharashtra Legislature | (Archived images)

अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि खासगी वृत्तवाहिणीचे संपादक पत्रकार अर्णव गोस्वामी (Arnab Goswami) यांच्या विरोधात राज्यविधिमंडळाच्या पावासाळी अधिवेशनात आज हक्कभंग प्रस्ताव (Privilege Motion) सादर करण्यात आला. काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी कंगना रानावत हिच्याविरोधात विधानपरिषद सभागृहात हक्कभंग सादर झाला. तर अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहात हा प्रस्ताव सादर झाला. आमदार प्रताप सरनाईक यांनी विधासभेत हा प्रस्ताव मांडला. त्यामुळे आज दिवसभर हक्कभंग प्रस्ताव हा शब्द चर्चेत राहिला. हक्कभंग प्रस्ताव म्हणजे नेमके काय हे आपल्याला माहिती आहे काय? जाणून घ्या हक्कभंग प्रस्ताव म्हणजे नेमके काय?

हक्कभंग म्हणजे काय?

लोकसभा खासदार आणि विधानसभा आमदार यांना राज्यघटनेने काही विशेष अधिकार दिलेले असतात. असेच विधानसभेने नेमलेल्या एखाद्या अभ्यास अथवा चौकशी समितीलाही प्राप्त असतात. या अधिकारांना धक्का लावणारे, किंवा या अधिकारांच्या आड येणारे वर्तन अथवा वक्तव्य कोणतीही व्यक्ती अथवा समुह, संस्था करु शकत नाही. कायद्याने त्यांना तसे करता येत नाही. विधिमंडळ अथवा संसद सभागृहात एकाद्या सदस्याने उच्चारलेल्या शब्दाला, विचारावर विधानसभेच्या बाहेर आव्हान देता येत नाही. तसेच, त्यावर टीका-टिप्पणी करता येत नाही. जर कोणाकडून असे घडले तर तो हक्क ठरतो. (हेही वाचा, Privilege Motion Against Kangana Ranaut: कंगना रणौत हिच्याविरुद्ध विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव दाखल)

हक्कभंग निदर्शनास आणण्याचे प्रकार

सभागृह अथवा सदस्याचा अवमान झाल्यास हा प्रकार सभागृह सभापती अथवा अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिला जातो. हा प्रकार चार प्रकार निदर्शनास आणला जातो. (हेही वाचा,Privilege Motion Against Arnab Goswami: अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात विधिमंडळात हक्कभंगाचा प्रस्ताव सादर )

1. विधिमंडळ सभासदाकडून तक्रार

2. विधानसभा सचिवांचा अहवाल

3. याचिका

4. सभागृह समितीचा अहवाल

हक्कभंग प्रस्ताव सिद्ध झाल्यास शिक्षा काय?

जर एखादा व्यक्ती, संस्था, समूह यांच्या विरोधात हक्कभंग सिद्ध झाला तर अशा व्यक्ती, संस्था, समूह यांना सभागृह शिक्षा करु शकते. ज्या व्यक्ती विरोधात हक्कभंग प्रस्ताव आला आहे. तो व्यक्ती जर सभागृहाचा सदस्य असेल तर त्याला समज दिली जाऊ शकते. त्याला निलंबीत केले जाऊ शकते. अरोपी हा जर तिऱ्हाईत व्यक्ती असेल तर त्याला समज दिली जाऊ शकते, दंड आकारला जाऊ शकतो किंवा तुरुंगवास अथवा इतर कोणतीही शिक्षा ठोठावली जाऊ शकते.