अर्णव गोस्वामी हे वाईट बु्द्धीने आणि हेतुपुरस्सर बोलत आहेत. ऐवढेच नाही तर सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी राजकीय नेत्यांचा काहीही संबंध नाही. त्यामुळे आपल्याच विचाराने गोस्वामी बोलत असून स्वातंत्र्याच्या नावाखाली दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. या व्यतिरिक्त प्रताप सरनाईक यांनी रिपब्लिकन टीव्ही चॅनल बंद करण्यात यावे अशी मागणी सुद्धा केली आहे.(Yashomati Thakur Tweet: कलाकार व न्युज वाल्यांनी राजकीय अजेंडा राबवताना महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळ करु नये - यशोमती ठाकुर)
रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनीवरील अनेक कार्यक्रमांमध्ये संपादक, वृत्तनिवेदक अर्णव गोस्वामी यांनी मा. मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांबाबत हेतुपुरस्सर आक्षेपार्ह विधाने केली आहेत. यासाठी त्यांच्याविरुद्ध नियम 203 अन्वये विशेषाधिकारभंगाचा प्रस्ताव मी आज विधानसभा अध्यक्षासमोर मांडला. pic.twitter.com/xFxnZaA8Yr
— Pratap Sarnaik (@PratapSarnaik) September 8, 2020
दरम्यान आज विधिमंडळाच्या कामकाजाचा दुसरा दिवस आहे. परंतु यावेळी शिवसेनेकडून गोस्वामी यांनी केलेल्या विधानांना लक्ष करत त्यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच गोस्वामी जाणीवपूर्वक अत्यंत वाईट भाषा वापरता असे ही विधिमंडळात बोलण्यात आले. प्रताप सरनाईक नंतर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सुद्धा अर्णव गोस्वामी हे स्वत: न्यायाधीश असून खटला चालवतात आणि निकाल देतात असा संताप सुद्धा व्यक्त केला. अर्णव गोस्वामी यांच्या मुद्द्यानंतर सभागृहात गदारोळ निर्माण झाल्याने कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केले होते.