Yashomati Thakur Tweet: कलाकार व न्युज वाल्यांनी राजकीय अजेंडा राबवताना महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळ करु नये - यशोमती ठाकुर
Women and Child Development Minister, Yashomati Thakur (PC - Twitter)

राज्यात सध्या सुशांत सिंह राजपूत आणि कंगना हिने केलेल्या विधानांमुळे सध्या वातावरण तापलेले आहे. या प्रकरणी राजकीय नेते सुद्धा सहभागी झाले असून आरोप प्रत्यारोप एकमेकांवर करण्यात येत आहेत. याच दरम्यान आता, राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अॅड यशोमती ठाकूर यांनी एक ट्वीट केले आहे. त्यात यशोमती ठाकूर यांनी असे म्हटले आहे की, काही सिने कलाकार-न्यूज अँकर्स सातत्याने महाराष्ट्राची बदनामी करत असतात. त्यामुळे काही राजकीय अजेंडा असेल तर तो राबवा पण म्हणून इथल्या जनतेच्या अस्मितांशी खेळू नका.राजकारण हे राजकारण्यांना करू द्या, नाही तर तुम्ही थेट राजकीय प्रवाहात या. असं आडून आडून खेळण्यात काही मजा नाही! असे ट्वीट केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कंगना हिने मुंबईला पाकव्याप्त कश्मीर असल्याचे म्हटल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहेच.  पण आता कंगना हिला केंद्र सरकारकडून Y पद्धतीची सुरक्षितता दिल्याने ही वाद उफाळून येत आहेत. काहींनी कंगना हिला पाठिंबा दिला असून काही जण तिच्या विधानांवरुन टीका करत आहेत.(Kangana Ranaut वर कारवाई करण्याची आमदार प्रताप सरनाईक यांची विधानसभा अध्यक्षांना लेखी विनंती; गृहमंत्र्यांना तातडीने चौकशी करून 24 तासात अहवाल सादर करण्याचे आदेश)

दरम्यान, कंगना ही उद्या मुंबईत येणार असल्याचे तिने ट्वीट करत म्हटले होते. परंतु आता मुंबईच्या महापालिका किशोरी पेडणेकर यांनी तिच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्का मारण्याच्या तयारीत असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी संजय राऊत यांनी सुद्धा कंगनाने केलेल्या विधानावरुन तिने माफी मागितल्यास विचार करु असे म्हटले होते.