Shiv Sena Vs Kangana Ranaut: शिवसेना IT Cell कडून कंगना रनौत विरोधात ठाणे शहरात पोलिस तक्रार दाखल; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
Shiv Sena IT Cell | Photo Credits: Twitter

बॉलिवुड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि शिवसेना (Shiv Sena)  यांच्यामध्ये आता रोजच शाब्दिक चकमक उडताना दिसत आहे. दरम्यान मुंबई शहराची तुलना पाकिस्तान व्याप्त कश्मीर सोबत केल्यानंतर ट्वीटरवर सेना कार्यकर्ते आणि कंगनामध्ये कलगीतुरा चांगला रंगला आहे. या प्रकरणामध्ये आता शिवसेना आय टी सेल (Shiv Sena IT Cell)  कडून ठाण्याच्या श्रीनगर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. यामध्ये कंगना च्या मुंबईला POK सोबत तुलना करण्यावरून देशद्रोहाचा आरोप लावत FIR दाखल करण्याबाबत सांगितले आहे.

कंगना रनौतने मुंबईची पाक व्याप्त कश्मीर सोबत तुलना करत मुंबई मध्ये मला पोलिसांची बॉलिवूड माफियांपेक्षा भीती वाटते. शिवसेना खासदारां संजय राऊत यांनी मला मुंबई मध्ये परतू नकोस अशी खुली धमकी दिली आहे. अशाप्रकारची ट्वीट्स केली होती. त्यानंतर भडकलेल्या शिवसैनिकांनी देखील कंगनाची पोस्टर्स फाडत तिच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. कंगनाने माफी मागावी अन्यथा मुंबईत आल्यानंतर तिचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं आहे. Kangana Ranaut on Sanjay Raut: संजय राऊत मी तुमची निंदा करते, तुम्ही महाराष्ट्र नाही आहात; कंगना रनौत हिचे सडेतोड उत्तर

ANI Tweet 

सध्या हिमाचल प्रदेश मध्ये असलेली कंगना 9 सप्टेंबरला मुंबईत दाखल होणार आहे. कंगनाला काल केंद्रीय गृहमंत्रालयाने Y+ दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. तसेच कंगनाने देखील मी मुंबईला येतेय ज्यांच्यात हिंमत असेल त्यांनी अडवून दाखवा असं खुलं आव्हान दिलं आहे. दरम्यान शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी 'मुंबईची पाकव्याप्त काश्मीर व तालिबानशी तुलना करून बेछूट आरोप करणाऱ्या कंगनावर योग्य ती कारवाई करण्याची लेखी विनंती विधानसभा अध्यक्षांना केली. त्यांनी गृहमंत्र्यांना याची तातडीने चौकशी करून 24 तासात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे' असे ट्वीट देखील काल केले होते.