Tribute to Corona Warriors at the Gateway of India (Photo Credits-ANI)

भारताचा येत्या 15 ऑगस्टला 73 वा स्वातंत्र्य दिन सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. याच पार्श्वभुमीवर आज नौदलाच्या बँड पथकाकडून कोरोना योद्धांना विशेष मानवंदना देण्यात आली आहे. मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाच्या प्रांगणात संध्याकाळच्या वेळेस नौदल बँड पथकाने सादरीकरण करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे सुद्धा पालन करण्यात आले आहे. कोरोना सारख्या महासंकटावेळी प्रत्येक कोविड योद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावताना दिसून येत आहे. त्याचसोबत राज्य सरकार सुद्धा कोरोनाच्या विरोधातील लढाई जिंकण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे.

कोरोना व्हायरसवर अद्याप लस उपलब्ध नसल्याने जगभरातील वैज्ञानिक त्यावर संशोधन करत आहेत. तसेच सध्या कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा वापर करुन त्यांची प्रकृती सुधारली जात असल्याचे दिसून आले आहे.(मुंबई: राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी जेजे रुग्णालयाला दिली भेट; डॉक्टर्स, नर्ससह अन्य कर्मचाऱ्यांच्या कामाचे केले कौतुक)

Tweet:

Video:

दरम्यानस काल मुंबई  मध्ये कोरोना विषाणूच्या  862 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण रुग्णांची संख्या 1,21,027 वर पोहोचली आहे. आज शहरात 1,236 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत 93,897 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या शहरामध्ये 20,143 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज मुंबईमध्ये 45 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत एकूण 6,690 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बीएमसी  ने याबाबत माहिती दिली. आज मृत्यू झालेल्या 29 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते.