Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at JJ Hospital (Photo Credit-ANI)

मुंबईत कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच महापालिका सुद्धा कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी वेळोवेळी खबरदारी घेत आहेत. याच दरम्यान आता महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुंबईतील शासकीय रुग्णालय सर जेजे हॉस्पिटलला (Sir JJ Hospital) भेट दिली आहे. या वेळी कोश्यारी यांनी डॉक्टर्स, नर्ससह अन्य कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक सुद्धा केले आहे.(Coronavirus treatment charges: कोरोना व्हायरस उपचारांवरील खासगी रुग्णालयांच्या वाढत्या बिलाला भरारी पथकांचा चाप- राजेश टोपे यांची माहिती) 

कोरोनासारख्या महासंकट काळात डॉक्टर्स, नर्स पॅरामेडिकल वर्कर्स आणि या संदर्भातील सर्विस पुरवणाऱ्या कर्मचारी आपली जीवाची पर्वा न करता रुग्णांवर उपचार करत आहेत. त्याचसोबत कोविड वॉरिअर्स सुद्धा आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत.(Coronavirus Update in Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी, पाहा आजचे ताजे अपडेट्स एका क्लिकवर)

दरम्यानस काल मुंबई  मध्ये कोरोना विषाणूच्या  862 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण रुग्णांची संख्या 1,21,027 वर पोहोचली आहे. आज शहरात 1,236 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत 93,897 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या शहरामध्ये 20,143 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज मुंबईमध्ये 45 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत एकूण 6,690 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बीएमसी  ने याबाबत माहिती दिली. आज मृत्यू झालेल्या 29 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते.