Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

गेल्या 5 महिन्यांपासून भारतात ठाण मांडून बसलेल्या कोरोना व्हायरस (Coronavirus) या महाभयाण विषाणूने अनेकांना आपल्या विळख्यात घेतले आहे. यामुळे दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाने (Maharashtra Health Department)  दिलेल्या माहितीनुसार राज्यात काल दिवसभरात 10,483 रुग्णांची वाढ झाली असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 4,90,262 वर पोहोचली आहे. राज्यात काल 300 कोरोना रुग्ण दगावले असून मृतांची एकूण संख्या 17,092 वर पोहोचली आहे. सद्य घडीला राज्यात 1,45,582 रुग्णांवर उपचार सुरु असून 3,27,281 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर 3.49% एवढा आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 66.76 % एवढे झाले आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 25,69,645 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 4,90,262 (19,07% ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9,92,075 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 35,262 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

हेदेखील वाचा- Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 862 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,21,027 वर

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी (7 ऑगस्ट रात्री 8: 00 वाजेपर्यंत)

Maharashtra COVID-19 Patient Number (Photo Credits: AIR/Twitter)

दरम्यान भारत केंद्र सरकार आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिलेल्या माहितीनुसार, 62,538 नव्या रुग्णांसह देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 20,27,075 वर पोहोचली आहे. भारतात 6 ऑगस्टपर्यंत कोरोना व्हायरसच्या 2,27,24,134 नमुने तपासण्यात आले असून काल दिवसभरात एकूण 5,74,783 चाचण्या घेण्यात आल्या अशी माहिती ICMR ने दिली आहे.