Coronavirus | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्राची राजधानी मुंबई (Mumbai) मध्ये आज कोरोना विषाणूच्या (Coronavirus) 862 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण रुग्णांची संख्या 1,21,027 वर पोहोचली आहे. आज शहरात 1,236 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत 93,897 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या शहरामध्ये 20,143 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज मुंबईमध्ये 45 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत एकूण 6,690 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बीएमसी (BMC) ने याबाबत माहिती दिली. आज मृत्यू झालेल्या 29 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते.

त्यातील 31 रुग्ण पुरुष व 14 रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 1 जणांचे वय 40 वर्षाखाली होते. 33 जणांचे वय 60 वर्षा वर होते, तर उर्वरित 11  रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. सध्या मुंबई जिल्ह्यातील बारे झालेल्या रुग्णांचा दर 77 टक्के आहे. 31 जुलै ते 6 ऑगस्ट पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 0.82 टक्के राहिला आहे. 6 ऑगस्ट 2020 पर्यंत झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या 5,83,160 इतक्या आहेत. मुंबईतील दुप्पटीचा दर आता 85 दिवसांवर पोहोचला आहे. (हेही वाचा: कोरोना व्हायरस उपचारांवरील खासगी रुग्णालयांच्या वाढत्या बिलाला भरारी पथकांचा चाप- राजेश टोपे यांची माहिती)

पीटीआय ट्वीट -

मुंबईमध्ये संनिरीक्षणा दरम्यान भेट दिलेल्या घरांची संख्या 47,34,239 इतकी आहे, तर SpO: तपासणी केलेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या 7,62,066 इतकी आहे. महाराष्ट्राबाबत बोलायचे झाले तर, राज्यात आज 10,483 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 4,90,262 अशी झाली आहे. आज नवीन 10,906 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 3,27,281 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण 1,45,582 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.