Coronavirus treatment charges: कोरोना व्हायरस उपचारांवरील खासगी रुग्णालयांच्या वाढत्या बिलाला भरारी पथकांचा चाप- राजेश टोपे यांची माहिती
Rajesh Tope | (Photo Credits: Facebook)

कोरोना व्हायरस (Coronavirus संक्रमित रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचारांवर खासगी रुग्णालयं (Private Hospitals) वाढीव बिल आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी सऱ्हास होत आहेत. नागरिक आणि कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या तक्रारींची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. यापुढे अशा प्रकारचे बिल आकारणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई केली जाईल. त्यासाठी राज्यात भरारी पथक (Bharari Squad) नेमण्यात आली आहेत. ही भरारी पथकं खासगी रुग्णालयांवर धाडी टाकतील आणि बिलांची तपासणी करतील, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे.

राजेश टोपे यांनी माहिती देताना सांगितले की, भरारी पथकं नेमण्याबाबतचे पत्र आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांना पत्र पाठविले. तसेच, या पथकांनी केलेल्या तपासणीचा अहवाल तीन दवसांमध्ये राज्य शासनाला पाठविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांना अत्यंत वाजववी दरात उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी राज्य सरकारने स्पष्ट अधिसूचना काढली आहे. राज्य सरकारने 21 मे 2020 या दिवशी काढलेल्या अधिसूचनेद्वारे सर्व खासगी रुग्णालयांना कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांवरील उपचारांच्या खर्च आकारणीबाबत कमाल मर्यादा निश्चित करुन दिली आहे. (हेही वाचा, Maharashtra Unlock 3: एक सप्टेंबरपासून शाळा सुरु होण्याची शक्यता, केंद्र सरकारकडू विचार सुरु)

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना राज्यातील सर्व नागरिकांना लागू करणयाचा निर्णयही 23 जानेवारी रोजीच घेण्यात आला आहे. शिवाय 30 जून 2020 रोजी झालेल्या शासन निर्णयातही खासगी वाहने आणि रुग्णवाहिका अधिग्रहीत करून त्यांचे कमाल दर ठरवून देण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी खाटा उपलब्ध करुन देण्याबाबतही अधिसूचनेद्वारे सांगण्यात आले आहे. दरम्यान, असे असले तरीही काही रुग्णालयं रुग्णांना वाढीव बिल आकारत असल्याच्या तक्रारी होत आहेत. या सर्वांवर कारवाई करण्यासाठी आणि अशा रुग्णालयांचा शोध घेण्यासाठी भरारी पथकं नेमली असल्याचे राजेश टोपे म्हणाले.