Cold in Maharashtra | Temperature Maharashtra | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

महाराष्ट्रात पुढचे तीन ते चार दिवस किमान तापमानात (Temperature in Maharashtra) घट होण्याची शक्यता आहे. त्यामळे येत्या काळात महाराष्ट्रात थंडीचा (Cold) कडाका वाढू शकतो. हवामान विभागाने ही माहिती दिली आहे. मुंबई, ठाणे जिल्ह्यातील तापमान 15 तर मध्य महाराष्ट्र विदर्भात हेच तापमान 10 अंशांपर्यंत घटण्याची शक्यता आहे. मुंबईसोबतच ठाणे आणि पुणे जिल्ह्यातही किमान तापमानात घटले आहे. त्यामुळे हवेतील गारठा (Weather in Maharashtra) वाढला आहे.

पुणे शहर आणि ग्रामीण भागात हवामान बऱ्यापैकी कोरडे आहे. त्यामुळेही वातावरणात गारवा जाणवत आहे. पुढचे काही काळ अशीच स्थिती राहिली तर पुण्यातही थंडीचा कडाका चांगलाच वाढण्यची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे. तापमान 14 ते 18 अंश सेल्सिअस इतके पाहायला मिळत आहे. पुणे, नगर , नाशिक, जळगाव या भागात हवेतील गारवा वढल्याने थंडी चांगलीच जाणवत आहे.

हवामान विभागने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा आणि बिहार राज्याचा पश्चिम भाग या दरम्यान हवेमध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे क्षेत्र विदर्भ, झारखंड, छत्तिसगड यादरम्यान समुद्र सपाटीपासून साधारण 800 ते 900 फूट उंचीवर आहे. त्याचाही काही ठिकाणी परिणाम जाणवतो आहे. परंतू हे क्षेत्र विशेष सक्रीय नाही. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि इतर काही ठिकाणी वातावरण कोरडे पाहायला मिळत आहे. अशा ठिकाणीही थंडी वाढली आहे. विदर्भात तर तापमान नेहमीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसने घसरले आहे. (हेही वाचा, Temperature of Madhya Maharashtra: जळगाव, नाशिक, मालेगवासह मध्य महाराष्ट्राचे आजचे किमान तापमान घ्या जाणून)

अनेकांनी राज्यातील थंडीचे वर्णन गुलाबी थंडी असे केले असले तरी थंडी चांगलीच बोचरी आहे. या थंडीचा परिणाम राज्यातील कृषी क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर होतो. राज्यातील पीके आणि फळझाडे यांच्यावर रोगराईचे प्रमाण वाढते. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रा डाळींब आणि द्राक्षे पिकांना याचा मोठा फटका बसतो. थंडीमुळे डाळींबाला तडे जातात तर द्राक्षांमध्ये आंबटपणा वाढताना पाहायाल मिळतो.