Temperature Maharashtra | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

मध्य महाराष्ट्रातील (Temperature of Madhya Maharashtra) काही जिल्ह्यांमध्ये किमान तापमानाची नोंद झाली. प्रादेशिक हवामान केंद्राचे के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी जळगव (Jalgaon), नाशिक (Nashik), मालेगाव (Malegaon) , पुणे (Pune), सातारा (Satara), डहाणू (Dahanu) , ठाणे (Thane), सांताक्रूझ (Santacruz ) आदी ठिकाणचे तापमान सांगितले. अशाच प्रकारचे तापमान पुढील 48 तास कायम राहण्याची शक्यता होसाळीकर यांनी व्यक्त केली.

आजचे तापमान खालीलप्रमाणे

  • जळगव 10°C
  • नाशिक 10.4°C
  • मालेगाव 12.2°C
  • पुणे 13.6°C
  • सातारा 15.5°C
  • डहाणू 18.2°C
  • ठाणे 18.6°C
  • सांताक्रूझ 16.4°C

दरम्यान, हवामान विभागाने या आधीच अंदाज वर्तवला आहे की, महाराष्ट्रावर पुढचे आठवडाभर 1010 हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहणार आहे. यामध्ये विदर्भातील तापमान 3.1, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत 1.6 ते 3 अंश सेल्सिअसने अधिक राहू शकते. याशिवाय नेहमीच्या तुलनेत सरासरी तापमानही वाढू शकते. (हेही वाचा, Maharashtra Weather Forecast: फेब्रुवारी महिन्यात राज्यात अनुभवायला मिळणार पावसाळी वातावरण; कोकण, पश्चिम, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता)

गेले दोन दिवस मुंबईसह राज्यातील काही भागांमध्ये तापमान घटले आहे. काही ठिकाणी गारठा वाढला असून थंडी जाणवत आहे. काही ठिकाणी थंड हवा वाहात आहे. काही ठिकाणे मात्र या वातावरणाला अपवाद असून त्या ठिकाणी स्वच्छ सूर्य प्रकाश आणि उन जाणवत आहे.