महाराष्ट्रात विविध ठिकाणी पुढील चार ते पाच दिवसांत विजांच्या कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस (Weather Forecast) कोसळण्याची शक्यात पुणे वेधशाळेने (IMD Pune) व्यक्त केली आहे. अरबी समुद्र (Arabian Sea) आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होऊन पुढचे चारपाच दिवस वरुणराजा हजेरी लावण्याची चिन्हे आहेत. प्रामुख्याने कोकण (Konkan), पश्चिम महाराष्ट्र (Paschim Maharashtra) आणि मराठवाडा (Marathwada) आदी विभागांमध्ये मोठ्या प्रामाणावर पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
दरम्यान, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातही पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. काल (17 नोव्हेंबर) काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी तुरळक प्रमाणात पडल्या. मुंबई, ठाणे जिल्ह्यातील हलक्या प्रमाणात असलेली थंडी गायब झाली असून, दमट हवामानामुळे उकाडा वाढला आहे. वातावरणही ढगाळ पाहायला मिळते आहे. (हेही वाचा, World Meteorological Day 2021: जागतिक हवामान दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि यावर्षीची खास थीम)
पुणे वेधशाळेणे वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पुढील पाच दिवस विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला पश्चिम महाराष्ट्रातही पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळेल. मराठवाड्यात बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांत तर नंदुरबार, धुळेसह विदर्भातील इतरही काही जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावेल.
ट्विट
17 Nov:
अरबी समुद्रात निर्माण कमी दाबाचे क्षेत्र व संबंधित सिस्टिम मधून कोकण किनारपट्टी मध्ये द्रोणीय स्थिती. परिणामी किनारपट्टी व आतल्या भागात ढगाळ वातावरण. क.दा.क्षे. 48 तासात किनारपट्टी पासून दूर जाऊन अजून दाट होण्याची शक्यता.
17-21 Nov राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. pic.twitter.com/erBaLEoKv7
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 17, 2021
हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी
हवामान विभागाने तारीखनिहाय यलो अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार 18 नोव्हेंबर रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदगर, नाशिक, धुळे आणि नंदूरबा जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट आहे. 19 नोव्हेंबरला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक जिल्ह्यांमध्ये, 20 नोव्हेंबरला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदगर, नाशिक, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर, नंदुरबार, नांदेड तर 21 नोव्हेंबरला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदगर, नाशिक, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे.