World Meteorological Day 2021 (PC - File Image)

World Meteorological Day 2021: जगभरात 23 मार्च हा दिवस 'जागतिक हवामान दिन' म्हणून साजरा केला जातो. हवामानशास्त्राबरोबरचं त्यात होणाऱ्या बदलांविषयी लोकांना जागरूक करणे हा त्यामागील हेतू आहे. दरवर्षी त्यासाठी एक थीम सेट केली जाते. या थीमच्या आधारे वर्षभर काम केलं जातं. हवामानाची स्थिती जाणून घेण्यासाठी आणि त्याचा सकारात्मक-नकारात्मक परिणाम जाणून घेण्याच्या उद्देशाने जागतिक हवामान संस्था 1950 मध्ये स्थापन केली गेली. त्याचे मुख्यालय जिनेव्हा, स्वित्झर्लंडमध्ये आहे. जागतिक हवामान संघटनेचे एकूण 191 सदस्य देश व प्रांत आहेत. ही संस्था पूर, दुष्काळ आणि भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा अंदाज घेण्यासाठी वापरली जाते. जेणेकरून होणाऱ्या नुकसानीपासून बचाव होऊ शकेल.

जागतिक हवामान दिन 2021 ची थीम -

जागतिक हवामान दिनाची यावर्षीची थीम 'महासागर, जलवायू आणि हवामान,' अशी आहे. यासह, जगातील शाश्वत विकासासाठी संयुक्त राष्ट्रांचे महासागर विज्ञान दशक देखील सुरू केले जात आहे. मागील वर्षी या दिवसाची थीम 'हवामान आणि पाणी,' अशी होती. यावर्षीच्या थीमवरून हे स्पष्ट होते की, त्याचा उद्देश महासागराच्या स्वच्छता आणि संवर्धनाशी संबंधित आहे.

हा दिवस कसा साजरा केला जातो?

आधीच नमूद केल्याप्रमाणे जगभरातील191 देश जागतिक हवामान संस्थेचे सदस्य आहेत. या दिवशी जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हवामानाचा नमुना आणि नैसर्गिक आपत्ती बदलणार्‍या गोष्टींविषयी लोकांना जाणीव करून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. जागतिक हवामान दिनाच्या दिवशी शाळा, महाविद्यालये, कार्यालये अशा अनेक ठिकाणी वादविवाद, कला स्पर्धा आयोजित केल्या जातात.