Rain | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

Maharashtra Weather Forecast: राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावासाचे (Weather Forecast) ढग जमू लागले आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. खास करुन गुरुवा, शुक्रवार आणि शनिवार हे तीन दिवस महाराष्ट्रातील विविध विभागांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह दमदार पावसाची उपस्थिती पाहायला मिळू शकते. राजधानी मुंबईत मात्र पावसाचे कोणतेही चिन्ह नाही. उलट मुंबईतील वातावरण बरेचसे कोरडे असू शकते. मुंबईला लागून असलेल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी शुक्रवारी पाहायला मिळू शकतात.

गुरुवार- पावसाची शक्यता असलेले जिल्हे

कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ (हेही वाचा, अवकाळी पावसामुळे गव्हाचे नुकसान, केंद्राने राज्य सरकारकडे मागवला अहवाल)

शुक्रवार- कोणकोणत्या विभागाता पावसाची शक्यता?

मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाची शक्यता. सोबतच कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्गामध्येही पावसाची सरी. दरम्यान, नाशिक, अहमदनगर, पुणे येथेही तुरळक पावसाची शक्यता.

ट्विट

यलो अलर्ट असलेले जिल्हे

हवामान विभागाने शुक्रवारपर्यंत काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. यात अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. दरम्यान, मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.