अवकाळी पावसामुळे गव्हाचे नुकसान, केंद्राने राज्य सरकारकडे मागवला अहवाल
Wheat (Credits: Pixabay)

अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस (Rain), गारपीट आणि वादळामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या कठीण काळात केंद्र सरकार (Central Government) राज्य सरकारच्या पाठीशी उभे आहे. हवामानाच्या तडाख्याचा सामना करणाऱ्या उत्तर भारतातील पाच राज्यांमध्ये गव्हाच्या (Wheat) पिकाच्या झालेल्या नुकसानीचा अहवाल केंद्राने राज्य सरकारांना (State Government) सादर करण्यास सांगितले आहे. हवामानामुळे पिकांच्या नुकसानीच्या बाबतीत उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये नुकसानीचे मूल्यांकन केले गेले आहे, तर पंजाब आणि हरियाणामध्ये नुकसानीचे मूल्यांकन केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये 5.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव मनोज आहुजा यांनी गहू पिकाच्या नासाडीबाबत बैठक घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. गव्हाच्या पिकाचे नुकसान झालेल्या राज्यांसाठी लवकरच मदत जाहीर केली जाईल, असे मानले जात आहे. हेही वाचा Ajit Pawar On PM: पंतप्रधानांच्या पदवीपेक्षा महागाई, बेरोजगारी आणि ढासळत चाललेले प्रश्न आहेत, अजित पवारांचे वक्तव्य

खराब हवामानामुळे पिकांचे नुकसान आणि कापणीच्या आव्हानांची शेतकऱ्यांना भीती वाटते. केंद्रीय मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवला तर, यंदा सुमारे 340 लाख हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. चालू वर्ष 2023-24 (जुलै-जून) मध्ये 112.2 दशलक्ष टन गव्हाचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज सरकारने व्यक्त केला आहे, परंतु भू-राजकीय अनिश्चिततेमध्ये जग महागाई आणि अन्न सुरक्षा संकटाचा सामना करत असताना पिकाचे नुकसान झाले आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या प्रमुख गहू उत्पादक राज्यांमध्ये पश्चिमी विक्षोभामुळे वादळ, गारपीट आणि जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे. ती आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूपीच्या 11 जिल्ह्यांतील 1,07,523 शेतकऱ्यांनी 35,480.52 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे.

हे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना 58 कोटी 59 लाख 29 हजार रुपयांची भरपाई दिली जाणार आहे.  शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा देण्याच्या सूचना मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी दिल्या आहेत. दुसरीकडे, हरियाणात आतापर्यंत 7.30 लाख एकर पिकाचे नुकसान झाले आहे. हेही वाचा Swiggy CTO Dale Vaz Resign: स्विगीचे सीटीओ डेल वाझ यांनी दिला राजीनामा; त्यांच्या जागी मधुसूदन राव यांची नियुक्ती

राज्यातील 5000 गावांतील 1.30 लाख शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई पोर्टलवर पीक अपयशाची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे पंजाबमध्ये 13 लाख हेक्टरपेक्षा जास्त गहू आणि फळे आणि भाजीपाला पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी नुकसानीचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.