Weather News Maharashtra: राज्यात पुढील चार दिवस उष्णतेची लाट (Heatwave) राहील असा अंदाज हवामान खात्याने (Weather Department Maharashtra) वर्तवला आहे. कोकण वगळता उर्वरीत महाराष्ट्रात पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम राहील असे सांगताना हवामान खात्याने म्हटले आहे की, आजचा दिवस सोडून म्हणजेच सोमवार (1 एप्रिल 2019) पासून पूढील चार दिवस महाराष्ट्र उष्णतेच्या लाटेचा सामना करेन.
गेल्या काही काळापासून महाराष्ट्र पर्यावरणातील बदलाचा सामना करत आहे. राज्यातील काही ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशाच्याही पार गेला आहे. तर, काही ठिकाणी 38 ते 39 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाच्या झळा आणि उनाच्या त्रासापासून बचाव करण्यासाठी आवश्यकता असे तरच घराबाहेर पडा. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे शक्यतो टाळाच, असे अवाहन हवामान खात्याने केले आहे. ( मुंबई: उन्हाचा पारा 40.3° वर पोहचला; Dehydration पासून दूर राहण्यासाठी खास टीप्स )
महाराष्ट्रातील तापमानाची ताजी नोंद
चंद्रपूर - 41 अंश सेल्सिअस
नागपूर - 40 अंश सेल्सिअस
औरंगाबाद - 39 अंश सेल्सिअस
सोलापुर - 39 अंश सेल्सिअस
अक्कलकोट - 38 अंश सेल्सिअस
बार्शी - 38 सेल्सिअस
पिंपरी - चिंचवड 37 अंश सेल्सिअस
दरम्यान, उन्हाळ्याच्या काळात लहान बालके, महिला, वृद्ध अशा मंडळींनी आरोग्याची अधिक काळजी घ्यायला हवी असे वैद्यकीय आणि आरोग्य विषयातील तज्ज्ञ सांगतात. शितपेयं, फ्रिजमध्ये अतिप्रमाणात थंड केलेले पदार्थ, बर्फ, उष्ण आहार अधिक प्रमाणात घेणे शक्यतो टाळावे, असे तज्ज्ञ सांगतात. तर, त्याउलट ताक, कैरीचं पन्ह, मडक्यातील पाणी, लिंबूपाणी (साधे) अशा पदार्थांचे तुम्ही सेवन करु शकता, असेही हे जाणकार सांगतात.